मंत्रीमंडळ विस्तार याचिकांवर शुक्रवारी फैसला

ok
गुरुवार, 12 सप्टेंबर 2019

पक्षांतर करुन आलेल्या नेत्यांविरोधात करण्यात आलेल्या याचिकेवरील मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणी पूर्ण झाली असून, निकाल वाचनाला प्रारंभ झाला आहे.

मुंबई : माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह भाजपमध्ये पक्षांतर करुन आलेल्या नेत्यांविरोधात करण्यात आलेल्या याचिकेवरील मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणी पूर्ण झाली असून, निकाल वाचनाला प्रारंभ झाला आहे. शुुक्रवारी यावर फैैसला जाहीर होणार आहेे.

मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी पाटील यांच्यासह जयदत्त क्षीरसागर आणि अविनाश महातेकर यांचा समावेश भाजपमध्ये झाल्यानंतर त्यांना मंत्रीपदावर नियुक्त केले आहे. याविरोधात न्यायालयात जनहित याचिका करण्यात आल्या आहेत. याचिकांवरील सुनावणी न्या. एस. सी. धर्माधिकारी आणि न्या. गौतम पटेल यांच्या खंडपीठावरील सुनावणी पूर्ण झाली आहे.

दरम्यान, घटनात्मक तरतुदीनुसार पक्षांतर करुन आलेल्या आणि आमदारकीचा राजीनामा देऊन आलेल्या नेत्याला मंत्रीपदावर नियुक्त केल्यास त्यांना सहा महिन्यात निवडणुकीतून निवडून येणे बंधनकारक आहे, मात्र आता येत्या निवडणुकांमुळे हा कालावधी मिळणार नाही, त्यामुळे अशाप्रकारची नियुक्ती होऊ शकत नाही, असा दावा याचिकादाराकडून करण्यात आला आहे. मात्र सरकारकडून या दाव्याचे खंडन करण्यात आले. शुक्रवारी यावर निकाल जाहीर होण्याची शक्‍यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cabinet Extension Petition Decision On Friday