कर्करोगावर उपयुक्त ठरणार प्रोटॉन थेरेपी, मुंबईतील टाटा रुग्णालयात पहिले केंद्र

कर्करोगावर उपयुक्त ठरणार प्रोटॉन थेरेपी, मुंबईतील टाटा रुग्णालयात पहिले केंद्र

मुंबईः  कर्करोगाच्या पेशींवर तात्काळ घाव घालण्यासाठी उपयुक्त ठरत असलेल्या प्रोटॉन थेरेपीसाठी आवश्यक प्रोटॉन बीमचे उत्पादन टाटा मेमोरियल कर्करोग रुग्णालयाच्या खारघर केंद्रामध्ये शुक्रवारपासून सुरु होणार आहे. 

कर्करोगावर रेडिएशन थेरपीने उपचार दिले जातात. पण, प्रोटॉन थेरेपीने हे सर्व दुष्परिणाम टाळून शरीरातील इतर पेशींना न मारता फक्त कर्करोगाच्या पेशींवर हल्ला केला जाईल. 2021 पासून ही थेरेपी रुग्णांसाठी उपलब्ध होणार असल्याचे टाटा रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

बालकांसाठी उपयुक्त ठरणार

रेडिएशन थेरपीचा सर्वाधिक दुष्परिणाम बालकांवर होतो. बालकांच्या शरीरातील स्नायू, हाडे, मेंदू, हृदय यांच्या वाढीमध्ये अडथळे निर्माण होतात. पण, रेडिएशनमध्ये कमीत कमी डोस देऊन अधिकाधिक कर्करोगांच्या पेशी नष्ट करणे आणि दुष्परिणाम टाळण्यासाठी प्रोटॉन थेरपी विकसित केली जात आहे. 

टाटा मेमोरियल हे पहिले केंद्र 

खारघर येथील केंद्रामध्ये प्रोटॉन थेरपी सुरू करण्यासंदर्भात मागील दोन वर्षांपासून पूर्वतयारी सुरू होती. सार्वजनिक आरोग्य क्षेत्रामध्ये ही थेरपी उपलब्ध करणारे टाटा मेमोरियल हे पहिले केंद्र आहे. यासाठी हैड्रॉन बीम थेरपी (प्रोटॉन) यंत्र खारघर येथील केंद्रात आणले आहे. थेरपीसाठीच्या प्रोटॉन बीमचे उत्पादन 31 जुलैपासून सुरू होणार आहे. ही उपचारपद्धती खर्चीक असली तरी टाटा रुग्णालयात दरवर्षी सुमारे 800 रुग्णांना याचा फायदा होणार असून यातील 50 टक्के रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार आहेत.

दर्जेदार उपचार करण्याबरोबरच टीएमसी

प्रोटॉन थेरपीसाठी अधिक चांगल्या प्रकारे भूमिका घेतली आहे. प्रोटॉन थेरपी संशोधन करण्यावर लक्ष केंद्रित करुन ट्यूमरचे प्रकार आणि क्षमता वाढवण्यासाठी नोडल सेंटर देखील आहेत. सार्वजनिक आरोग्य क्षेत्रामध्ये ही थेरपी उपलब्ध करणारे टाटा मेमोरियल हे पहिले केंद्र आहे. कर्करोगग्रस्तांच्या उपचारांसाठी ही थेरेपी फायदेशीर ठरेल, असं मुंबईतील टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांनी म्हटलं आहे.

संपादनः पूजा विचारे

cancer Proton therapy Starting today Tata Memorial Hospital

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com