esakal | आता कोरोना रुग्णांच्या तपासणीसाठी वापरण्यात येणार कॅप्सूल बुथ! वाचा काय आहे संकल्पना
sakal

बोलून बातमी शोधा

आता कोरोना रुग्णांच्या तपासणीसाठी वापरण्यात येणार कॅप्सूल बुथ! वाचा काय आहे संकल्पना

खादी संशयित व्यक्ती एका बंधिस्त खोलीत शिंकली तर तो संसर्ग त्या खोलीपुरता मर्यादित राहू शकेल. हाच संसर्ग टाळण्यासाठी मुंबईतील एका डॉक्टरने अद्ययावत कॅप्सूल बूथचे संशोधन केले आहे. ज्यामुळे, होणारा संसर्ग टाळता येऊ शकतो. 

आता कोरोना रुग्णांच्या तपासणीसाठी वापरण्यात येणार कॅप्सूल बुथ! वाचा काय आहे संकल्पना

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई -  कोणत्याही व्यक्तीच्या नाकात कोणतीही गोष्ट घातली तर त्या व्यक्तीला शिंका येते. त्यातून समोरच्या व्यक्तीवर शिंतोडे उडतात. अशा वेळी जर एखादी कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती कोणतीही खबरदारी न घेता खुल्या परिसरात शिंकला तर तो त्या संपूर्ण परिसरात संसर्गित करण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण, तेच जर एखादी संशयित व्यक्ती एका बंधिस्त खोलीत शिंकली तर तो संसर्ग त्या खोलीपुरता मर्यादित राहू शकेल. हाच संसर्ग टाळण्यासाठी मुंबईतील एका डॉक्टरने अद्ययावत कॅप्सूल बूथचे संशोधन केले आहे. ज्यामुळे, होणारा संसर्ग टाळता येऊ शकतो. 

मुंबईतील महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सध्या कोरोनाच्या लढाईत डॉक्टरांना सर्वाधिक संसर्ग होण्याची भिती असून नकळत कोरोना रुग्णांच्या तपासणीने मुंबईतील रुग्णालयेच सील होत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना रुग्णांच्या तपासणीसाठी अद्ययावत कॅप्सूल सेल युनिटचे संशोधन करण्यात आले‌ आहे. हे मशीन संपूर्ण भारतीय बनावटीचे असून कोरोना रुग्णांच्या तपासणीसाठी जगभरातील हा पहिला प्रयोग ठरेल.

मशीन कसं काम करेल ?
एखादा रुग्ण जर या मशीनच्या आत गेल्यास डॉक्टर त्या रुग्णाला बाहेरुन नेमकं काय करायचं याबाबत सल्ला देतील. तिथून रुग्णाला डॉक्टरशी संवाद साधता येईल. कुर्ला येथे खासगी प्रयोग शाळेत हे युनिट आहे. रुग्णांना हाताळताना सर्वाधिक संपर्क डॉक्टरांचा येतो. यातील काहींना बाधा होण्यास सुरुवात झाली आहे.  हे मशीन मेक इन इंडिया अंतर्गत असून भारतीय बनावटीचे आहे. ही वाढती संख्या रोखण्यासाठी कॅप्सूल बूथ एक योग्य उपकरण असेल अशी आशा  संशोधक डॉ . विक्रांत सनगर यांनी व्यक्त केली आहे. 

रुग्णांची नोंद ही ठेवता येणार - 
या कॅप्सूल बूथमध्ये कोरोना रुग्णाच्या प्राथमिक तपासणी पासून जवळपास सर्वच नोंदी घेतल्या जात आहेत. यात रुग्णाचा चेहरा देखील नोंद होत असल्याने कालांतराने या रुग्णाने खोटी माहिती देऊन स्वत:ला लपवण्याचा प्रयत्न केला तरीही त्याचा शोध घेता येऊ शकतो. सध्या कोरोना रुग्णांना तपासताना लागणारे पीपीइ किटची संख्याही कमी आहे. मात्र, या कॅप्सूलमुळे स्वाब सारखी नमुने घेण्याची पद्धत ही रुग्ण आणि डॉक्टर यांच्यात विशिष्ठ पडदा असल्याने संसर्ग होत नाही. यामुळे पीपीई किट नसला तरी चालू शकतो. 

याविषयी माहिती देताना संशोधक डॉ. विक्रांत सनगर यांनी सांगितले कि, " एखाद्या व्यक्तीच्या नाकातोंडात काहीही घातलं तर ती शिंकतेच. यातून संसर्ग होण्याची शक्यता आहे. या संसर्गात सर्वात आधी डॉक्टर्स येतात. या संसर्गातून वाचण्यासाठी कॅप्सूल बूथ महत्त्वाचे ठरेल. फक्त दोन दिवसांत हे मशीन तयार करण्यात आलं आहे. शिवाय, रुग्णाचे कमीत कमी खर्चात कसे निदान होईल यासाठीही सर्वतोपरी विचार करुन हे बूथ तयार करण्यात आले आहे. शिवाय, जी कोणी व्यक्ती या मशीनमध्ये निदानासाठी येईल तो सीसीटिव्हीच्या नजरेत येईल. त्याने जरी खोटी माहिती दिली तरी त्याला शोधता येऊ शकते. "  

अधिक आणि सविस्तर बातम्या वाचण्यासाठी ईपेपर वाचा

कॅप्सूल बूथ म्हणजे एक बंदिस्त खोली आहे. यात ऑक्सिजनपासून आवश्यक त्या गोष्टी यात रचल्या गेल्या आहेत. त्यामुळे, डॉक्टर थेट रुग्णाच्या संपर्कात येत नाही. त्या रुग्णाला या खोलीत जावे लागते. या खोलीत संपूर्ण नोंद होत असते . कधी कधी एखादा रुग्ण पहिल्या तपासणीत निगेटिव्ह दाखवतो नंतर तो पॉजिटीव्ह येतो. अशावेळी यात चुकलेल्या दुव्यांची पुर्न:पडताळणीची  सोय करण्यात आली आहे. हि तपासणी सर्व्हर होत असल्याने कोणी यात बदल करू शकत नाही. या खोलीत गेल्यावर रुग्ण संपूर्ण सॅनिटाईज होऊन बाहेर येताना कोणतेही संसर्ग बाहेर आणत नाही, हे ही डॉ. विक्रांत सनगर यांनी स्पष्ट केले आहे . 

loading image
go to top