Police Exam Case
Police Exam Casesakal

Police Exam Case : भरती परीक्षेत कॉपी करणारे परीक्षार्थी पोलिसांच्या जाळ्यात; ब्ल्यू टूथचा केला होता वापर

उमेदवारांनी कॉपी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा गैरवापर केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे.
Summary

शिपाई पदाच्या भरतीच्या अनुषंगाने लेखी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. ७ मे रोजी एकाच वेळी मुंबईतील एकूण २१३ केंद्रांवर लेखी परीक्षा झाली.

मुंबई : मुंबई पोलिस दलातील (Mumbai Police Force) भरती प्रक्रियेसाठी रविवारी (ता. 7) उमेदवारांची लेखी परीक्षा मुंबईत पार पडली; मात्र त्यात गैरप्रकार करणारे परीक्षार्थी पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत.

कॉपी करणाऱ्या उमेदवारांविरोधात मुंबई पोलिसांनी कस्तुरबा मार्ग पोलिस ठाणे, गोरेगाव पोलिस (Goregaon Police) ठाणे, मेघवाडी पोलिस ठाणे आणि भांडुप पोलिस (Bhandup Police) ठाण्यात चार स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. उमेदवारांनी कॉपी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा गैरवापर केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे.

कॉपी करणाऱ्यांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. रवींद्र काळे, नीतेश आरेकर, अशोक ढोले इत्यादी आरोपींना पोलिसांनी '४१ अ'ची नोटीस देऊन सोडले आहे. कस्तुरबा मार्ग पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जे. बी. खोत हायस्कूल केंद्रावर रवींद्र काळे कानात ब्ल्यू टूथचा वापर करून उत्तरपत्रिका सोडवत होता. त्याच्या साथीदाराचा शोध पोलिस घेत आहेत.

Police Exam Case
Political News : 'या' बड्या नेत्याच्या घरी अजित पवारांची NCP नेत्यांसोबत खलबत्तं; राजकीय चर्चांना उधाण

युवराज जारवाल आणि बबलू मेढरवाल यांच्यावर मात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. आरोपींच्या साथीदारांचाही पोलिस शोध घेत आहेत. शिपाई पदाच्या भरतीच्या अनुषंगाने लेखी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. ७ मे रोजी एकाच वेळी मुंबईतील एकूण २१३ केंद्रांवर लेखी परीक्षा झाली. ८३ हजार ७४८ पैकी एकूण ७८ हजार ५२२ परीक्षार्थी उपस्थित होते. परीक्षेकरिता एकूण १२४६ पोलिस अधिकारी आणि ५९७५ अंमलदार यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Police Exam Case
Nana Patole : मुख्यमंत्री शिंदेंसह 16 आमदार अपात्र ठरतील; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा मोठा दावा

इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसचा वापर

भांडुप परीक्षा केंद्रावर बबलूसिंग मेंढरवाल ईअरबर्डद्वारे अज्ञात व्यक्तीच्या संपर्कात राहून पेपर सोडवत होता. विशेष म्हणजे त्याने उजव्या हातात मनगटापासून कोपरापर्यंत सनग्लोव्हज् घातले होते. त्यामध्ये सिमकार्ड, चार्जिंग सॉकेट आणि मायक्रो माईक असलेले आयताकृती इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस लपवले होते. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन गुन्ह्याची नोंद केली. भांडुप व मेघवाडी पोलिस ठाणे परिसरातील केंद्रावरही अशाच प्रकारे कॉपी करण्याचा प्रयत्न केला गेला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com