Sameer Wankhede News : समीर वानखेडे सीबीआयच्या रडारवर! उद्या पुन्हा होणार चौकशी

Sameer Wankhede
Sameer Wankhedeesakal

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) मुंबईचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या अडचणी पुन्हा वाढताना दिसत आहेत. सीबीआयने १८ मे रोजी समीर वानखेडे यांना हजर राहण्यासाठी समन्स बजावलं आहे.वानखेझे यांची मुंबईत चौकशी होणार असून त्यांच्यावर अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानच्या मुलाला ड्रग्ज प्रकरणात अडकण्यापासून वाचवण्यासाठी २५ कोटी रुपयांची लाच मागीतल्याचा आरोप आहे.

क्रूझ ड्रग्ज प्रकरणात सीबीआयने नुकतेच समीर वानखेडे यांच्या घरावर देखील छापेमारी देखील केली होती. या प्रकरणात वानखेडे यांच्यावर खंडणी आणि भ्रष्टाचाराचे आरोप आहेत.

या प्रकरणात समीर वानखेडे यांच्यसह ५ जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ज्यामध्ये एनसीबीच्या इतर अधिकाऱ्यांचा समावेश आहे. याच प्रकरणात सीबीआयने २० ठिकाणी छापे टाकले आहेत, ज्यात मुंबई, रांची, कानपूर, दिल्लीचा समावेश होता.

Sameer Wankhede
Aadhaar Card : पायाचे ठसे वापरून बनवलं आधार कार्ड...; टोळीचा कारनामा वाचून सगळेच चक्रावले!

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात समीर वानखेडे आणि इतरांनी २५ कोटींची मागणी केली आणि ५० लाख खंडणी घेतल्याचा आरोप सीबीआयच्या एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोचे (NCB) तपास अधिकारी विश्वविजय सिंह यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आलं होतं.

Sameer Wankhede
Trimbakeshwar Temple Controversy : 'इथून पुढे मंदिराच्या पायऱ्यांवर…'; 'ती' मिरवणूक काढणाऱ्यांचा उद्वेग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com