
मुंबईः बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास CBIकडे सोपवल्यानंतर आता सीबीआयच्या टीमनं चौकशीला सुरुवात केली आहे. त्यानंतर सीबीआयने तपासाचा वेग वाढवला आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय)सुशांतचा नोकर आणि मित्र सिद्धार्थ पिठाणी या प्रमुख साक्षीदारांची चौकशी केली. याशिवाय सुशांतच्या शवविच्छेदन अहवालाबाबतही सीबीआयने अधिक माहिती घेतली.
आज सुशांतचा नोकर नीरज याच्याकडून सीबीआयनं अधिक माहिती घेतली. नीरजची सलग तिसऱ्या दिवशी सुशांत प्रकरणी सीबीआयने चौकशी केल्याचं समजतंय. सीबीआयकडून शवविच्छेदनाबाबत काही प्रश्न उपस्थित करण्यात आलेत. त्यात शवविच्छेदन अहवालामध्ये टाइम स्टँप नाही. पोलिसांना याबाबत डॉक्टरांना प्रश्न विचारणं आवश्यक होते की वेळेचा कॉलम रिकामा का आहे. मात्र पोलिसांनी असे केले नाही, अशी प्रतिक्रिया डॉ. सुधीर गुप्ता यांनी दिली आहे. यामुळे या शवविच्छेदन अहवालाची पडताळणी करण्यास तीन ते चार दिवस जाण्याची शक्यता आहे.
शवविच्छेदन अहवालात वेळेचा रकाना रिकामा असण्याबाबत ते मुंबईतील डॉक्टरांशी बोलणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. त्यानंतर याबाबत विस्तारित प्रतिक्रिया दिली जाईल. तसंच सुशांतच्या शवविच्छेदन अहवालाबाबत शंका उपस्थित झाल्यानं न्यायवैधक तज्ज्ञांचे पथक त्याच्या शरीरावरच्या जखमांचा आणि इतर गोष्टींचा अभ्यास करणार असून त्याचा अहवाल सीबीआयला देणार आहे. याबाबत सीबीआयच्या पथकानं शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांकडूनही माहिती घेतली आहे.
या सर्व गोष्टीची पडताळणी करून ही आत्महत्या आहे की हत्या याबाबतही हे पथक त्यांचे मत देणार आहेत. त्यामुळे त्यांचा हा अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे. सीबीआयने यासंदर्भात न्यायवैद्यक विभागाला विनंती केली होती. त्यानुसार न्यायवैधक विभागाचे प्रमुख डॉ सुधीर गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे.
मुंबई पोलिसांकडे असलेली कागदपत्र आणि सर्व अहवाल यांचा अभ्यास करून ही समिती आपला अहवाल देणार आहे. रविवारी नोंदवण्यात आलेल्या दोन्ही जबाबांची मुंबई पोलिसांना दिलेल्या जबाबाशीही त्याची पडताळणी करण्यात आली आहे. शनिवारी सुशांतच्या घरात सीबीआयने आत्महत्येच्या घटने दिवशी घडलेला संपूर्ण आभासी स्वरूपात केला. रविवारीही सीबीआयचे एक पथक नीरज आणि पिठानी यांना घेऊन सुशांतच्या घरी गेले होते.
(संपादनः पूजा विचारे)
CBI team visited Sushant Singh Rajput home second day
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.