
अंबरनाथ : अंबरनाथ पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका चोरट्याने मोबाईल दुकान फोडल्याची घटना घडली होती. अखेर सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी संशयित चोरट्याचा शोध घेतला. हा चोरटा अल्पवयीन असल्याने त्याच्या पालकांना नोटीस देण्यात आली असून, त्याच्याजवळून एक लाखाच्या महागड्या वस्तू हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.