
गुन्हा करून गुन्हेगार पळाल्यानंतर त्याचा त्वरित तपास लागावा.त्यांच्या मुसक्या आवळून गुन्हेगारीला आळा घालता यावा, म्हणून वसई विरार शहरात एकूण 145 सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत.
वसई ः गुन्हा करून गुन्हेगार पळाल्यानंतर त्याचा त्वरित तपास लागावा.त्यांच्या मुसक्या आवळून गुन्हेगारीला आळा घालता यावा, म्हणून वसई विरार शहरात एकूण 145 सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. "एक कॅमेरा शहरासाठी' ही योजना राबविण्याकरीता मीरा भाईंदर वसई विरार आयुक्त सदानंद दाते यांनी आदेश दिले आहेत, त्यानुसार शहरात कॅमेरे लावण्यात आले आहेत याचे उदघाटन उपयुक्त संजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
वसईत शेतकऱ्याने एका एकरातून पिकवला ८00 किलो तांदूळ
वसई, वालीव, नालासोपारा, नवघर माणिकपूर, अर्नाळा सागरी, विरार, तुळींज सात पोलीस ठाणे हद्दीतील दुकाने, हॉटेल, बॅंक, पेट्रोलपंप, सोसायटी, ऑफिस, आस्थापना व इतर संस्था येथे नागिरांची भेट घेवून त्यांना या योजनेचे महत्त्व पटवून देण्यात आले. समाधान फाउंडेशन, हनुमान मंदिर, टेम्पो अशोशिएशन, कौल फाउंडेशन , केजीएन यांच्यासह अन्य संस्थांनी कॅमेरा बसवण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
वसई तालुक्यात औदयोगिक व नागरी वस्ती मोठया प्रमाणात असून सराफांची दुकाने लुटणे, घरफोडी आणि त्यातच धूम स्टाईलने येणारे सोनसाखळी चोर यांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे आरोपींना वेळीच जेरबंद करता यावे म्हणून एक कॅमेरा सुरक्षेचा उपक्रम पोलिसांनी हाती घेतला व त्याला वसईतील नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या उपक्रमामुळे गुन्हेगारीवर मात करण्यास मदत होईल असे मत पोलीस दलाकडून व्यक्त करण्यात येत आहे.
गुन्हेगारीवर प्रतिबंध व गुन्हयाचा तपास करताना वसई विरार शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे तपासाला निश्चितच उपयोगी ठरतील. शहरातील मुख्य तसेच अंतर्गत मार्गावर, वर्दळीच्या ठिकाणी कॅमेरे असल्याने नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार आहेत अद्याप कुठे सीसीटीव्ही लावावेत याचाही विचार सुरु आहे.
- संजय पाटील -
उपायुक्त , वसई
----------------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )