
कंत्राटदारांवर CCTV ची 'लाईव्ह' नजर, निकृष्ट दर्जाचे रस्ते बांधणाऱ्यांवर चाप
कंत्राटदारांच्या कामावर लक्ष्य ठेवण्यासाठी मुंबई मनपाने नवीन शक्कल लढवली आहे. मुंबई महानगरपालिकेने यापुढे सीसीटीव्हीच्या सहाय्याने प्रत्येक कामांवर लक्ष्य ठेवण्याचा निर्णय घेतलाय. कंत्राटदारांना त्यांच्या कामाचं 'लाईव्ह सीसीटीव्ही' प्रक्षेपण पालिका प्रशासनाला देणे यापुढे बंधनकारक असणार आहे. (CCTV watch on contractors )
रस्ते बांधताना किंवा सुधारणा करताना कंत्राटदार अनेकदा निकृष्ट दर्जाचं काम करतात. याला चाप बसवण्यासाठी पालिकेने नव्याने उपाययोजना केल्या आहेत. यामुळे कोणतेही काम सुरू असताना सीसीटीव्हीच्या माध्यमातून पालिकेच्या मुख्यालयातून त्याची 'लाईव्ह' पाहाणी करता येणार आहे. ही पाहाणीची प्रक्रिया मार्गी लावण्यासाठी गुणवत्ता व्यवस्थापन समिती नियुक्ती करण्यात आली असून २ वर्षांसाठी हे काम या संस्थेकडे देण्यात आलं आहे. (CCTV will keep watch on contractors in mumbai)
Web Title: Cctv Will Keep Watch On Contractors In Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..