डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती घरातच साजरी करा; डाॅ. राजेंद्र गवई यांचे आवाहन

सकाळ न्यूज नेटवर्क 
सोमवार, 6 एप्रिल 2020

जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे बहुजनांनी भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरी राहूनच साजरी करा, असे आवाहन आरपीआयचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ. राजेंद्र गवई यांनी केले आहे.  

मुंबई, : जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे बहुजनांनी भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरी राहूनच साजरी करा, असे आवाहन आरपीआयचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ. राजेंद्र गवई यांनी केले आहे.  

अधिक बातम्यांसाठी "ईपेपर" वाचा।

डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती बहुजनांकडून मोठ्या धूमधडाक्यात साजरी केली जाते. राज्यात प्रत्येक ठिकाणी जयंतीच्या पूर्वसंध्येलाच डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी रांगा लावल्या जातात. केक, पेढे, फटाके, आतषबाजी करून जयंतीचा उत्सव केला जातो. मात्र, या वर्षी कोरोनामुळे घरातच बसून डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना जोपासत कायदा व सुव्यवस्थेचे भान ठेवत घरातच जयंती साजरी करावी. भीम सैनिकांनी देशाच्या रक्षणासाठी घरातच जयंती साजरी करून नवीन इतिहास रचण्याचे आवाहन डाॅ. गवई यांनी केले आहे.

Celebrate the birth anniversary of Dr. Babasaheb Ambedkar AT HOME


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Celebrate the birth anniversary of Dr. Babasaheb Ambedkar AT HOME