Mumbai News : बड्डे आहे खड्ड्यांचा जल्लोष साऱ्या नागरिकांचा; मुंबईत खड्ड्यांचा वाढदिवस साजरा

खड्ड्यांचा वाढदिवस साजरा
खड्ड्यांचा वाढदिवस साजराSakal

मुंबई : मुंबईच्या कांदिवली येथे नागरिकांकडून चक्क खड्ड्यांचे वाढदिवस साजरे करण्यात आले आहेत. वारंवार पालिकेकडे तक्रार करूनही खड्डे दुरूस्त करण्यात आले नाहीत म्हणून नागरिकांनी हे पाऊल उचलले असून ढोल ताशांच्या गजरात जल्लोषात हा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे.

खड्ड्यांचा वाढदिवस साजरा
Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दरम्यान, गेल्या वर्षभरापासून कांदिवली परिसरात पडलेल्या खड्ड्यांबाबत स्थानिक नागरिकांनी पालिकेकडे अनेकदा तक्रारी केल्या होत्या पण त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नसल्यामुळे वैतागून नागरिकांनी निषेध म्हणून अनोखं आंदोलन करत थेट खड्ड्यांचा वाढदिवस साजरा केला आहे.

खड्ड्यांचा वाढदिवस साजरा
Beed News : राष्ट्रवादीच्या बड्या आमदाराकडून स्वतःच्या वडिलांना धक्काबुक्की; अदखलपात्र गुन्हा दाखल

यावेळी "हॅप्पी बड्डे खड्डेभाई" असे बॅनर धरून, खड्ड्यामध्ये केक ठेवून वाढदिवस साजरा करण्यात आला. "आमच्या इथे एक खड्डे भाई आहेत. ते महानगरपालिकेचे पुत्र आहेत. आम्ही गेल्या एक वर्षापासून पालिकेकडे तक्रारी करूनही निवारण झाले नसल्यामुळे आम्ही या खड्डेभाईंचा वाढदिवस साजरा केला आहे" असं मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com