मोबाईल चोरणारी चौकडी अटकेत

मोबाईल चोरणारी चौकडी अटकेत

ठाणे शहर, ता. २३ (बातमीदार) : विविध मार्गाने रेल्वे प्रवाशांच्या मोबाईलवर डल्ला मारणाऱ्या टोळीचा रेल्वे पोलिसांनी छडा लावला आहे. चोरीला गेलेल्या एका प्रवाशाचा मोबाईल ट्रेस करून पोलिस या टोळीपर्यंत पोहोचले आहेत. त्यांच्याकडून एक लाखाहून अधिक किमतीचे मोबाईल हस्तगत केले असून दोघा अल्पवयीन आरोपींसह इतर दोन तरुणांना अटक केली आहे.

ठाणे लोहमार्ग पोलिसांकडे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोबाईल फोन, बॅग चोरीला जाणे याबाबतच्या तक्रारी येत असतात. रेल्वे पटरीवर नशा करणारी मुले प्रवाशांच्या हातावर काठीने फटका मारत जीवितास व मालमत्तेला हानी पोहोचवत असतात. अशा स्वरूपाच्या गुन्ह्यांचा तपास ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथक तसेच मोबाईल ट्रेसिंग पथक करते. अशाच प्रकारचा तपास करून पोलिसांनी सोमवारी (ता. २०) एका चौकडीला अटक केली. या चौकडीकडून पोलिसांनी एक लाखाहून अधिक किमतीचे आठ मोबाईल हस्तगत केले. १६ मे रोजी लोकल रेल्वेने प्रवास करत असताना एकाचा लोहमार्ग पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल चोरीला गेला होता. तसा गुन्हा दाखल करून लोहमार्ग पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक अर्चना दुसाने यांनी त्यांच्या पथकाला निर्देश देऊन तपासाच्या कामाला लावले. मोबाईल ट्रेसिंग करणाऱ्या पथकाने फिर्यादी प्रवाशाचा मोबाईल ट्रेस करून मोठ्या कौशल्याने आरोपीचा ठिकाणा शोधला. त्यानंतर सोमवारी आरोपी सूरज रामचंद्र साबत (वय २०), पप्पुकुमार परमेश्वर मुखीया मत्ता (वय १९) आणि इतर दोन अल्पवयीन आरोपींना अटक केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com