
मध्य आणि हार्बर रेल्वेच्या उपनगरी मार्गावर देखभाल-दुरुस्तीसाठी रविवारी (ता.17) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मुंबई : मध्य आणि हार्बर रेल्वेच्या उपनगरी मार्गावर देखभाल-दुरुस्तीसाठी रविवारी (ता.17) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर रात्रकालीन ब्लॉक असेल. दिवसकालीन कोणताही ब्लॉक नसेल. या दरम्यान सीएसएमटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल विशेष सेवा चालविण्यात येणार आहेत. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10 ते दुपारी 4.30 या वेळेत मध्य मार्गावर आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गे जाण्याची परवानगी दिल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने सांगितले.
कुठे : माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन जलद
कधी : सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत
परिणाम : सीएसएमटी येथून सुटणाऱ्या डाऊन जलद सेवा माटुंगा येथे डाऊन धीम्या मार्गावर वळविल्या जातील. सायन व मुलुंड दरम्यानच्या सर्व स्थानकांवर थांबतील आणि नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिरा गंतव्यस्थानी पोहोचतील. ठाण्यापुढील जलद लोकल मुलुंड येथे डाऊन जलद मार्गावर पुन्हा वळविण्यात येतील.
मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा
कुठे : कुर्ला-वाशी अप आणि डाऊन
कधी : सकाळी 11.10 ते दुपारी 4.10
परिणाम : हार्बर मार्गावरील सीएसएमटी येथून वाशी/ बेलापूर/पनवेलसाठी सुटणाऱ्या डाऊन सेवा व सीएसएमटी पनवेल/बेलापूर/वाशी येथील सेवा बंद असतील.
कुठे : मुंबई सेंट्रल ते माटुंगा रोड अप आणि डाऊन जलद मार्ग
कधी : 17 जानेवारी रोजी मध्यरात्री 12 ते पहाटे 4
परिणाम : अंधेरी/संताक्रूझ आणि मुंबई सेंट्रलदरम्यान अप आणि डाऊन लोकल धीम्या मार्गावर.
Central, block on Harbor There is no daytime block on the Western Railway
------------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )