मुंबईत यायला निघाले 45 कोटींचे म्यॅव म्यॅव; मुंबईतील प्रयोगशाळा, हैद्राबादमधील कारखाना उद्धवस्त

मुंबईत यायला निघाले 45 कोटींचे म्यॅव म्यॅव; मुंबईतील प्रयोगशाळा, हैद्राबादमधील कारखाना उद्धवस्त

मुंबई : एक हजार कोटींची हेरॉईन पकडल्याची घटना ताजी असतानाच आणखी एका कारवाईत  250 किलो विविध प्रकारचे अंमली पदार्थ जप्त करण्यात महसुल गुप्तवार्ता संचलनालय (डीआरआय) यश आले आहे. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्सची किंमत 47 कोटी रुपये आहे. कारवााईत 45 लाख रुपयांचे भारतीय आणि परदेशी चलन जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी हैद्राबाद व मुंबईत विविध ठिकाणी डीआरआयने छापे मारून तिघांना अटक केली आहे.

15 ऑगस्टला संपूर्ण देश स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना डीआरआयचे अधिकारी अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत व्यस्त होते. हैद्राबादवरून ड्रग्स भरलेला संशयीत कंटेनर मुंबईत येत असल्याची माहिती मिळाली होती. डॅग्स पकडले गेले तरी, कोणाला अटक होऊ नये, यासाठी का खासगी बसमध्ये कार्गो कंटेनरमध्ये ड्रग्स लपवण्यात आले होते.

मात्र डीआरआयला गुप्त माहिती आधीच मिळाल्यामुळे त्यांनी बस सुटल्यावर कारवाई करून ड्रग्स पकडले. त्यानंतर करण्यात आलेल्या तपासात हे ड्रग्स मुंबईत जात असल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर मुंबई व हैद्राबादमध्ये राबवण्यात आलेल्या शोध मोहिमेत 250किलो ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. त्यात 210 किलो मेफेड्रॉन, 10 किलो केटामाईन व 31 किलो एम्फिटामाईनचा समावेश आहे. त्याची किंमत 47 कोटी रुपये आहे. याशिवाय 45 लाख किमतीचे भारतीय चलन, अमेरिकन डॉलर व युरो जप्त करण्यात आले आहेत.

डीआरआयचा तपास मुंबईतील केमिकल लॅबोरेटरी व हैद्राबादमधील रासायनिक कारखान्या पर्यंत पोहोचला असून यावेळी डीआरआयने एका सराईत आरोपींसह तिघांना अटक केली.

आरोपीने राहत्या घरातच प्रयोगशाळा उभी केली होती. मुख्य आरोपीला 2017 मध्येही ड्रग्स तस्करीत अटक केली होती. हैद्राबादमध्ये ड्रग्स बनवून मुंबईत पाठवण्यात येणार होते. त्यानंतर देशातील प्रमुख शहरांमध्ये त्याचा पुरवठा करण्यात येणार असल्याचे डीआरआयच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

मेफेड्रॉन हे रासायनिक ड्रग्स असून ते कोकेनसारखा नशा देते. म्यॅव म्यॅव म्हणूनही ते प्रसिद्ध आहे. केटामाईन हे पार्टी ड्रग्स असून त्याला डेट रेप ड्रग्सही बोलतात. आरोपी रॅकेटची परदेशापर्यंत पुरवठा साखळी आहे, त्याचा सर्व व्यवहार हवाला मार्फत होतो. 

( संकलन - सुमित बागुल )

central investigation agencies busted racket to carrying illegal powder worth 45 lac

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com