central railway
central railwaysakal media

मध्य रेल्वेत स्वच्छता संवाद पंधरवडा 

Published on

मुंबई : मध्य रेल्वेचे (central railway) महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी (anil kumar lahoti) यांनी 16 सप्टेंबर रोजी रेल्वे कर्मचाऱ्यांना (railway employees) स्वच्छता प्रतिज्ञा देऊन स्वच्छता पंधरवडा राबविण्याचे आदेश दिले आहे. शुक्रवारी स्वच्छता संवाद अंतर्गत मध्य रेल्वेवर मार्गावर गाड्या, स्थानके आणि रेल्वे परिसर यांच्या देखभालीसाठी (Railway cleaning) लोकांना प्रोत्साहित करण्यात आले.  तसेच, स्थानकांवर सार्वजनिक घोषणा (public appeal) करून कचराविरोधी, प्रदूषण करणाऱ्या घटकांबद्दल आणि प्लास्टिकच्या एकल वापराला आळा घालण्यासाठी जागरूकता निर्माण करण्यात आली.

central railway
मुंबई महापालिकेची वादग्रस्त रस्ते दुरुस्ती अडचणीत? फडणवीसांचे आयुक्तांना पत्र

या कार्यक्रमादरम्यान कोविड-19चे नियम पाळून स्वच्छता संवाद मोहिम राबविल्या जात आहे. सुमारे दोन हजार कर्मचारी आणि प्रवाशांनी यामध्ये सहभाग घेतला आहे. मुंबई विभागात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनवर बायो-टॉयलेटचा वापर आणि त्याचे फायदे याविषयी जनजागृती करण्यात आली. प्रवाशांमध्ये त्यांचा प्रवास स्वच्छ आणि पर्यावरणपूरक बनवण्यासाठी जागरूकता करण्यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक 18 च्या प्रवेशद्वाराजवळ जैव-शौचालयाशी संबंधित पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. 

स्थानके, रुग्णालये तसेच घरातील रहिवाशांना परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सल्ला देण्यात आला आणि एकदाच वापर होणाऱ्या प्लास्टिकच्या बंदीवर भर  देण्यात आला.  स्थानकांवर कचराविरोधी मोहीम हाती घेण्यात आली आणि अस्वच्छता करण्याऱ्यांना दंड करण्यात आला. श्रमदान उपक्रम आणि स्वच्छता उपक्रम देखील हाती घेण्यात आले. यावेळी रेल्वे प्रवाशांनी मध्य रेल्वेच्या स्वच्छतेच्या कार्याबद्दल प्रशंसा केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com