esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

railway fright.

23 मार्च ते 23 सप्टेंबर या कालावधीत मध्य रेल्वेने 25.46 दशलक्ष टन मालाची यशस्वीपणे वाहतूक केली आहे.

मध्य रेल्वेने लॉकडाऊन दरम्यान केली 25.46 दशलक्ष टनाची मालवाहतूक

sakal_logo
By
प्रशांत कांबळे

मुंबई : ऊर्जा आणि पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी वेळेवर सामान पोहचवून रेल्वेने कोविड-19 च्या कठीण परिस्थितीत लॉकडाऊन व अनलॉक असूनही मालगाड्या पूर्णपणे कार्यरत ठेवल्या आहे. 23 मार्च ते 23 सप्टेंबर या कालावधीत मध्य रेल्वेने 25.46 दशलक्ष टन मालाची यशस्वीपणे वाहतूक केली आहे. तर कोळशाच्या 1.83 लाख वाघिणीची वाहतूक सुद्धा करण्यात आली आहे.
 
वाघिणीच्या वाहतुकीबाबतीत 23 मार्च ते 23 सप्टेंबरपर्यंत 4,85,202 वॅगनची वाहतूक केली आहे. मध्य रेल्वेने 10,150 मालगाड्यांतून कोळसा, अन्नधान्य, साखर, पेट्रोलियम उत्पादने, खते, कंटेनर, लोखंड व स्टील, सिमेंट, कांदे आणि इतर विविध वस्तू वाहून नेल्या आहे. या कालावधीत दररोज सरासरी 2,623 मालवाहतुकीच्या वॅगन धावल्या आहे. 
 
मध्य रेल्वेने 1,83,538 कोळशाच्या वॅगन विविध विद्युत केंद्रांवर वाहतूक केली. तसेच अन्नधान्य आणि साखर 5,810 वॅगन वाहून नेली आहे. शेतकर्‍यांच्या हितासाठी 22,652 वॅगन खते आणि 7323 वॅगन कांदे, पेट्रोलियम पदार्थांचे 47,384 वाघिणी, लोखंड आणि स्टीलच्या 13053 वॅगन, 31251 वॅगन सिमेंट, 150212 कंटेनरच्या वॅगन आणि सुमारे 23979 वॅगन कडबा (डी -ऑईल केक) आणि संकीर्ण वस्तूंची वाहतूक केली.

संपादन - सुस्मिता वडतिले 

loading image
go to top