
मुंबई : मध्य रेल्वेने वातानुकूलित लोकलमधील प्रवास अधिक सुरक्षित, सोयीस्कर आणि नियमबद्ध करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. याच अनुषंगाने स्थापन केलेल्या ‘एसी लोकल टास्क फोर्स’ने वर्षभरात १.२२ लाख फुकट्या प्रवाशांवर कारवाई करीत चार कोटींचा दंड वसूल केला आहे. त्यामुळे एसी लोकलमध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत घट झाली आहे.