मुंबई : लोकल प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी, ठाणे-दिवानंतर आता कुर्ला-परळकडे लक्ष| Mumbai Railway update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai train
ठाणे-दिवानंतर आता कुर्ला-परळकडे लक्ष; पाचव्या-सहाव्या मार्गिकेसाठी प्रयत्न

मुंबई : लोकल प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी, ठाणे-दिवानंतर आता कुर्ला-परळकडे लक्ष

मुंबई : अनेक वर्षांपासून रखडलेल्या ठाणे ते दिवादरम्यानच्या (Thane-diva) पाचव्या-सहाव्या मार्गिकेचे काम पूर्णत्वास येत आहे. त्यानंतर आता मध्य रेल्वेने (central railway) कुर्ला-परळ दरम्यानच्या पाचव्या-सहाव्या मार्गिकेकडे (Fifth-sixth lane) लक्ष केंद्रित केले असून भूसंपादनाचे अडथळे दूर करण्यावर भर दिला जात आहे. या मार्गासाठी आवश्यक असलेल्या दोन हजार ६५६ चौरस मीटर जमिनीसाठी मध्य रेल्वेने एनटीसी कंपनीला (NTC company) १२१ कोटी रुपये दिले. तसेच या ठिकाणच्या ६४० व्यक्तींचे पुनर्वसन करण्यात येणार आहे.

हेही वाचा: Union Budget 2022 : मुंबईकरांच्या अपेक्षा काय आहेत ? वाचा सविस्तर

मुंबई रेल्वे विकास महामंडळ (एमआरव्हीसी) द्वारे मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प (एमयूटीपी-२) मधील मध्य रेल्वेवरील ठाणे-दिवा पाचवी-सहावी मार्गिकेचे काम पूर्णत्वास आले आहे. त्यामुळे मेल, एक्स्प्रेससाठी विशेष दोन मार्गिका झाल्याने लोकलच्या ५० ते ६० फेऱ्या वाढणार आहेत. त्यापाठोपाठ आता कुर्ला आणि परळदरम्यान पाचवी आणि सहावी मार्गिकेच्या कामासाठी रेल्वेने पुढाकार घेतला आहे. हा प्रकल्प वेळेत पूर्ण झाल्यास मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर होण्याची शक्यता आहे.

मध्य रेल्वेवरील लोकलसाठी कुर्ला ते सीएसएमटीपर्यंतच्या पाचव्या व सहाव्या मार्गिकेसाठी एमयूटीपी-३ अंतर्गत ६२१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पहिल्या टप्पात कुर्ला ते परळ आणि दुसऱ्या टप्प्यात परळ ते सीएसएमटी दरम्यानचे काम पूर्ण करण्यात येईल. त्यानुसार पहिल्या टप्प्याच्या कामासाठी मध्य रेल्वेने सुरुवात केली आहे. त्यासाठी दोन हजार ६५६ चौरस मीटर जमीन लागणार असून गिरण्यांच्या जमिनीसाठी रेल्वेने एनटीसीला गेल्या महिन्यात १२१ कोटी रुपये अदा केल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

बहुतांश भूसंपादन पूर्ण

कुर्ला ते परळ पाचव्या व सहाव्या मार्गिकेसाठी कुर्ला येथील स्वदेशी मिल, माटुंग्यातील टाटा पॉवर तसेच महापालिकेच्या जागेचा समावेश आहे. जमीनखरेदीची प्रक्रिया २०१७ मध्ये सुरू झाली. त्यातील बहुतांश खरेदी प्रक्रिया २०२१ मध्ये पूर्ण झाल्याची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: Central Railway Gives 121 Crore Fund To Ntc Company For Fifth And Six Lane Working Project Of Kurla Parel Way

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top