नागपूर-जबलपूर एक्स्प्रेसचा अमरावती पर्यंत विस्तार!

मध्य रेल्वेने नागपूर - जबलपूर एक्स्प्रेसचा आजपासून( ता.08) अमरावती पर्यंत विस्तार केला आहे.
express railway
express railwaysakal
Summary

मध्य रेल्वेने नागपूर - जबलपूर एक्स्प्रेसचा आजपासून( ता.08) अमरावती पर्यंत विस्तार केला आहे.

मुंबई - मध्य रेल्वेने नागपूर - जबलपूर एक्स्प्रेसचा आजपासून( ता.08) अमरावती पर्यंत विस्तार केला आहे. त्यामुळे नागपूर ते अमरावती दरम्यानचा सिंदी, वर्धा, पुलगाव आणि धामणगावमधील विद्यार्थ्यांना आणि नोकरदार वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक 12159/12160 नागपूर - जबलपूर- नागपूर एक्स्प्रेसला अमरावतीपर्यत विस्तारित करण्यात आला आहे. त्यानुसार आता ट्रेन क्रमांक 12159 अमरावती - जबलपूर एक्सप्रेस 8 ऑक्टोबर 2022 पासून अमरावती (नागपूर ऐवजी) येथून संध्याकाळी 4.45 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 06.55 वाजता जबलपूरला पोहोचेल. ट्रेन क्रमांक 12160 जबलपूर - अमरावती एक्सप्रेस 7 आक्टोबर 2022 रोजी जबलपूर येथून रात्री 9.20 वाजता सुटेल आणि अमरावती (नागपूरऐवजी) येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 09.50 वाजता पोहोचेल. जबलपूर आणि नागपूर दरम्यान या ट्रेनच्या थांब्यांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. नागपूर ते अमरावती दरम्यानच्या विस्तारित भागात सिंदी, वर्धा, पुलगाव आणि धामणगाव स्थानकावर थांबनार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com