मध्य रेल्वे चालविणार पुजा उत्सव विशेष 144 ट्रेन; सणउत्सवांच्या पार्श्वभूमिवर रेल्वेचा निर्णय

मध्य रेल्वे चालविणार पुजा उत्सव विशेष 144 ट्रेन; सणउत्सवांच्या पार्श्वभूमिवर रेल्वेचा निर्णय

मुंबई : सणउत्सवाच्या दरम्यान प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने मुंबई-मंडुआडीह,कानपूर सेंट्रल, छपरा, पुणे- गोरखपूर, झांशी, मंडुआडीह, लखनऊ, दरभंगा, जयपूर आणि अमरावती-तिरुपती दरम्यान एकूण 144 पूजा उत्सव विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.  

लोकमान्य टिळक टर्मिनस - मांडुआडीह द्वि-साप्ताहिक विशेष  (26 फे-या)
02167 ही विशेष द्वि-साप्ताहिक गाडी 19 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत दर सोमवार आणि शुक्रवारी रात्री 12.35 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटेल आणि दुसर्‍या दिवशी सकाळी 4.25 वाजता मंडुआडीह येथे पोहोचेल.
02168 द्वि-साप्ताहिक विशेष  20 ऑक्टोबर ते 1 डिसेंबर पर्यंत मंडुआडीह येथून दर मंगळवार आणि शनिवारी सकाळी 9.50 वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसर्‍या दिवशी दुपारी 12.25 वाजता पोहोचेल.

-  लोकमान्य टिळक टर्मिनस - कानपूर सेंट्रल द्वि-साप्ताहिक विशेष  (24फे-या)

04152 द्वि-साप्ताहिक विशेष ट्रेन 24 ऑक्टोबर ते 1 डिसेंबर दरम्यान दर मंगळवार आणि शनिवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 4.55 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी कानपूर सेंट्रलला दुपारी 3.25 वाजता पोहोचेल.
04151 द्वि-साप्ताहिक विशेष ट्रेन 23 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान दर सोमवार आणि शुक्रवारी कानपूर सेंट्रल येथून दुपारी 4.30 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी 3.30 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.

- मुंबई-छपरा उत्सव विशेष (12फे-या)
05101 उत्सव विशेष ट्रेन 20 ऑक्टोबर ते 24 नोव्हेंबर पर्यंत प्रत्येक मंगळवारी छपरा येथून रात्री 9.15 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे तिसर्‍या दिवशी सकाळी 6.15 वाजता पोहोचेल.
05102 उत्सव विशेष ट्रेन 23 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबर पर्यंत प्रत्येक शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दुपारी 3.30 वाजता सुटेल व तिसर्‍या दिवशी छपरा येथे सकाळी 4.40 वाजता पोहोचेल.
 
- पुणे-गोरखपूर साप्ताहिक विशेष  (12 फे-या)

01115  साप्ताहिक विशेष ट्रेन 22 ऑक्टोबर ते 26 नोव्हेंबर दरम्यान प्रत्येक गुरुवारी पुणे येथून 4.15 वाजता सुटेल व तिसर्‍या दिवशी रात्री 1.5 वाजता गोरखपूरला पोहोचेल.
 01116  साप्ताहिक विशेष ट्रेन  24 ऑक्टोबर ते 28 नोव्हेंबर प्रत्येक शनिवारी  गोरखपूर येथून 3.30 वाजता सुटेल व तिसर्‍या दिवशी सकाळी 4.5 वाजता पुण्याला पोहोचेल.

- पुणे - मंडुआडीह साप्ताहिक स्पेशल (14 फे-या) 

02135 साप्ताहिक विशेष ट्रेन 19 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान दर सोमवारी पुणे येथून दुपारी 4.15 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी 7.20 वाजता मंडुआडीह येथे पोहोचेल.
02136 साप्ताहिक विशेष ट्रेन 21 ऑक्टोबर ते 2 डिसेंबर दरम्यान दर बुधवारी  मंडईडीह येथून सकाळी 4.10 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी सकाळी 8.5  वाजता पुण्याला पोहोचेल.

- पुणे - लखनऊ साप्ताहिक विशेष (12 फे-या)

01407 साप्ताहिक विशेष ट्रेन 20 ऑक्टोबर ते 24 नोव्हेंबर दरम्यान दर मंगळवारी पुणे येथून रात्री 10 वाजता सुटेल व तिसर्‍या दिवशी रात्री 2.40  ​​वाजता लखनऊला पोहोचेल.
01408 साप्ताहिक विशेष ट्रेन 22 ऑक्टोबर ते 26 नोव्हेंबर  दरम्यान दर गुरुवारी सकाळी 6.30  वाजता लखनऊहून सुटेल आणि दुसर्‍या दिवशी सकाळी 11.5 वाजता पुण्याला पोहोचेल.

-  पुणे - दरभंगा साप्ताहिक विशेष (12 फे-या)
01033 साप्ताहिक विशेष ट्रेन 21 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर दरम्यान दर बुधवारी पुणे येथून दुपारी 4.15 वाजता सुटेल व तिसर्‍या दिवशी सकाळी 6.50 वाजता दरभंगा येथे  पोहोचेल. 
01034 साप्ताहिक विशेष ट्रेन 23 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबर  दरम्यान दर शुक्रवारी  दरभंगा येथून दुपारी 4.45  वाजता सुटेल व तिसर्‍या दिवशी सकाळी 8.5 वाजता पुणे येथे पोहोचेल.

- पुणे-गोरखपूर साप्ताहिक विशेष (12 फे-या)

05030 साप्ताहिक विशेष ट्रेन 24 ऑक्टोबर 28 नोव्हेंबर  दरम्यान दर शनिवारी पुणे येथून सकाळी 11.15 वाजता सुटेल आणि  दुसर्‍या दिवशी गोरखपूरला 8 वाजता पोहोचेल.
05029 साप्ताहिक विशेष 22 ऑक्टोबर ते 26 नोव्हेंबर दरम्यान प्रत्येक गुरुवारी गोरखपूरहून 5.25 वाजता सुटेल व तिसर्‍या दिवशी रात्री 3.30 वाजता पुण्याला पोहोचेल.

- पुणे-जयपूर उत्सव विशेष (24 फे-या)
 
02940 उत्सव विशेष ट्रेन 20 ऑक्टोबर ते 28 नोव्हेंबर दरम्यान 12 फेऱ्या प्रत्येक मंगळवार व शनिवारी  जयपूर येथून सकाळी 9.15  वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी सकाळी 8.5 वाजता पुण्याला पोहोचेल.
02939 उत्सव विशेष ट्रेन 21 ऑक्टोबर ते 29 नोव्हेंबर दरम्यान 12 फेऱ्या प्रत्येक बुधवार आणि रविवारी  पुणे येथून दुपारी 3.30 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी जयपूरला दुपारी 1.40 ​​वाजता पोहोचेल.
 
-  पुणे-झाशी साप्ताहिक विशेष  (12 फे-या)

04184 साप्ताहिक विशेष ट्रेन 22 ऑक्टोबर ते 26 नोव्हेंबर दरम्यान दर गुरुवारी पुणे येथून 3.15  वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी सकाळी 9.35 वाजता झांशीला पोहोचेल.
04183 साप्ताहिक विशेष ट्रेन 21 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर  दरम्यान दर बुधवारी झांशी येथून दुपारी 12.50  वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी सकाळी 9.15 वाजता पुण्याला पोहोचेल.

- अमरावती-तिरुपती उत्सव विशेष द्वि-साप्ताहिक (24 फे-या) 
 
 02765 उत्सव विशेष ट्रेन 20 ऑक्टोबर ते 28 नोव्हेंबर पर्यंत 12 फेऱ्या प्रत्येक मंगळवार व रविवारी तिरुपती येथून दुपारी 3.10 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी 2.50 वाजता अमरावतीला पोहोचेल.
 02766 उत्सव विशेष ट्रेन 22 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत 12 फेऱ्या प्रत्येक सोमवार आणि गुरुवारी अमरावती येथून सकाळी 6.45 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी सकाळी 6.40 वाजता तिरुपतीला पोहोचेल.

---------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com