Central Railway : मध्य रेल्वे सेवा कोलमडली; लोकल खोळंबल्या, प्रवाशांची जीवघेणी कसरत

मध्य रेल्वे मार्गावरील लोकल प्रवाशांसाठी सोमवारचा दिवस हा त्रासदायक ठरला. सकाळी सिग्नल यंत्रणेतील बिघाड आणि सायंकाळी ओव्हरहेड वायरचा खांब कोसळल्याने लोकलसेवा विस्कळीत झाली.
Central Railway service collapse
Central Railway service collapsesakal

डोंबिवली - मध्य रेल्वे मार्गावरील लोकल प्रवाशांसाठी सोमवारचा दिवस हा त्रासदायक ठरला. सकाळी सिग्नल यंत्रणेतील बिघाड आणि सायंकाळी ओव्हरहेड वायरचा खांब कोसळल्याने लोकलसेवा विस्कळीत झाली. लोकलचे वेळापत्रक बिघडल्याने व ऐन वेळेला लोकल कोणत्या फलाटावर येत आहे.

हे समजत असल्याने ती लोकल पकडण्यासाठी प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे चित्र डोंबिवली स्थानकात दिसून आले. प्रवाशांच्या या जीवघेणी कसरतीला रेल्वे प्रशासन जबाबदार आहे. स्थानकात योग्य घोषणा होत नसल्याने रेल्वे रूळ ओलांडून प्रवास करावा लागला.

सोमवारी सकाळी सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने लोकलची सेवा विस्कळीत झाली होती. लोकल उशिराने धावत असल्याने परिणामी कल्याण, डोंबिवली स्थानकात प्रवाशांची गर्दी उसळली. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नोकरदार वर्गाला लेट मार्कचा सामना करावा लागला. दिवसभराचे काम आटोपल्यानंतर सायंकाळी घरी तरी नीट जाता येईल का असे विचार डोक्यात घोळत असतानाच सायंकाळी देखील रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने रेल्वे प्रवाशांना त्याचा फटका बसला.

सायंकाळी 5 च्या दरम्यान मुलुंड स्थानकाच्या दरम्यान ओव्हरहेड वायरचा खांब कोसळल्याने रेल्वे सेवा विस्कळीत झाली. मुलुंड भांडुप ठाण्याच्या दरम्यान लोकांच्या रांगाच लागल्या तासभर लोकल जागेवरच उभी असल्यामुळे अनेक नागरिकांनी रेल्वे रुळांवर उतरून जवळचे स्थानक गाठणे पसंत केले. धीम्या मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाल्याने नागरिकांनी जलद लोकल पकडून डोंबिवली स्थानक गाठत पुढचा प्रवास करण्याची योजना आखली.

मात्र डोंबिवली स्थानकात देखील सावळा गोंधळ पाहायला मिळाला. फलाट क्रमांक चारवर येणारी आसनगाव लोकल अचानक फलाट क्रमांक दोनवर येत असल्याची घोषणा झाली आणि नागरिकांनी लोकल पकडण्यासाठी रेल्वे ट्रॅक वरून उडी मारत दोन नंबरचा फलाट गाठणे पसंत केले. लोकल वेळेवर नाही, त्यातच उद्घोषणा देखील लेट होत असल्यामुळे नागरिकांना या फलाटावरून त्या फलाटावर जाण्यासाठी कसरत करावी लागत होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com