esakal | लॉकडाऊनचा रेल्वेला मोठा आर्थिक फटका; तब्बल इतक्या कोटींचा झाला तोटा
sakal

बोलून बातमी शोधा

लॉकडाऊनचा रेल्वेला मोठा आर्थिक फटका; तब्बल इतक्या कोटींचा झाला तोटा

मार्चच्या उत्तरार्धापासून रेल्वे बंद असल्यामुळे उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. 

लॉकडाऊनचा रेल्वेला मोठा आर्थिक फटका; तब्बल इतक्या कोटींचा झाला तोटा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई ः कोरोना महामारी रोखण्यासाठी अमलात आलेल्या लॉकडाऊनमुळे आर्थिक फटका मोठ्या प्रमाणावर बसत आहे. मुंबची जीवनवाहिनी समजली जाणारी रेल्वे बंद असल्याचा फटका बसला नसता तरच नवल होते. मध्य आणि पश्चिम रेल्वेचा तोटा 3 हजार कोटीच्या पार गेला आहे आणि त्यात वाढच होण्याची चिन्हे आहेत. मार्चच्या उत्तरार्धापासून रेल्वे बंद असल्यामुळे उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. 

INSIDE STORY : कोरोनाबाबतच्या आतापर्यंतच्या ज्ञात आणि अज्ञात गोष्टी; 6 महिन्यानंतर आपण काय शिकलो, काय नाही...

पश्चिम रेल्वेचा तोटा 15 अब्ज 67 कोटी 98 लाख झाला आहे. त्यातील 2 अब्ज 27 कोटी 99 लाख उपनगरी सेवा बंद असल्यामुळे झाला आहे, तर 13 अब्ज 39 कोटी 99 लाख अन्य सेवा बंद असल्यामुळे झाला आहे. त्यानंतरही पश्चिम रेल्वे सातत्याने तिकीटाचा परतावा दिला जात आहे. त्यांनी 3 अब्ज 81 कोटी 69 लाख यासाठी दिले आहेत. त्यातील मुंबई विभागाने 1 अब्ज 81 कोटी 19 लाख दिले आहेत. आत्तापर्यंत 59 लाख 33 हजार तिकीटांचा परतावा देण्यात आला आहे. 
मध्य रेल्वेचा तोटा 15 अब्ज रुपयांवर गेला आहे. 23 मार्च ते 30 जून या कालावधीत 54 लाख प्रवाशांनी तिकीटे रद्द केली. त्यामुळे 3 अब्ज 87 कोटी 2 लाख रुपये परत करण्यात आले. 

मोठी बातमी - UBER ने मुंबई ऑफिस केलं बंद, मात्र ग्राहकांना कंपनी म्हणतेय...

पार्सल तसेच श्रमिक ट्रेनमुळे उत्पन्नात माफक वाढ झाली नाही. पश्चिम रेल्वेने 23 मार्च ते 1 जुलै या कालावधीत 374 पार्सल ट्रेनद्वारे 68 हजार 600 टनची वाहतूक केली. त्यात शेती उत्पादने, औषधे, मासे, दूध या जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करण्यात आली. त्यातून सुमारे 21 कोटी 99 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले.

loading image