Central Railway : 'मध्य रेल्वेची मालवाहतूकीत सर्वोत्तम कामगिरी! ७७८.९५ कोटींची केली कमाई!

Central Railway
Central Railway

मुंबई : मध्य रेल्वेने गेल्या मे महिन्यात ७.५३ दशलक्ष टनची विक्रमी मालवाहतूक केली आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत ७.३० दशलक्ष टन मालवाहतूक करण्यात आली होती. त्यामध्ये ३.२१ टक्के वाढ झाली असून आतापर्यतची सर्वोत्तम मालवाहतूक असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहेत.

Central Railway
Shivaji Maharaj : 'अरबी समुद्रा'तून शिवरायांना शिवराज्यभिषेक दिनी अनोखी मानवंदना!

मध्य रेल्वेने गेल्यावर्षी मे महिन्यात ७१७.९० कोटींचे उपन्न मिळवले होते यंदा ७७८.९५ कोटींचा मालवाहतूक उत्पन्न मिळवले आहे. मध्य रेल्वेने सर्व विभागात मालवाहतुकीत कामगिरी सुधारली आहे ज्यामुळे मध्य रेल्वे गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत वाढीव लोडिंग साध्य करू शकली आहे.

मध्य रेल्वेने मे -२०२२ मध्ये १७१ रेकच्या तुलनेत मे -२०२३ मध्ये सिमेंट आणि क्लिंकरचे २३६ रेक लोड केले आहेत. मे -२०२२ मधील ८८ रेकच्या तुलनेत मे -२०२३ मध्ये खताचे ११४ रेक लोड करण्यात आले आहेत. तसेच मे -२०२२ मधील ६३ रेकच्या तुलनेत मे-२०२३ मध्ये ऑटोमोबाईल्सचे ७४ रेक लोड करण्यात आले आहेत. मे -२०२३ मध्ये कंटेनर लोडिंगमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत ७.१ टक्के सुधारणा झाली आहे. मे -२०२२ मध्ये ७०१ रेकच्या तुलनेत मे -२०२३ मध्ये ७५१ रेक लोड करण्यात आले आहेत.

Central Railway
शिंदें गटाच्या कार्यालयासमोरून जात होती राऊतांची गाडी; कार्यकर्त्यांनी 'असं' केलं की पोलिसांची... | Sanjay Raut

मे -२०२२ मधील १९८ रेकच्या तुलनेत मे -२०२३ मध्ये पेट्रोलियम उत्पादनांचे २१५ रेक लोड केले गेले. मे -२०२२ मधील ११५ रेकच्या तुलनेत मे -२०२३ मध्ये लोह आणि स्टीलचे लोडिंग १४८, मे -२०२२ मधील ५५ रेकच्या तुलनेत मे -२०२३ मध्ये लोहखनिजाचे लोडिंग ८५ रेकपर्यंत वाढले आहे.मे २०२२ मध्ये लोड केलेल्या ८ रेकच्या तुलनेत डी-ऑईल केकचे १८ रेक लोड केले गेले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com