
मुंबई : राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या प्रवेशासाठी (Eleventh Admission) राज्य शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षेच्या (CET) नोंदणी प्रक्रियेला दुपारी 3.00 वाजता सुरुवात झाली. पहिल्या पाच तासात तब्बल 2 लाख 1 हजार 20 विद्यार्थ्यांनी नोंदणी (Student Registration) पूर्ण केली असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील (Dinkar Patil) यांनी 'सकाळ' शी बोलताना दिली. (CET first day more than two lac student registered- nss91)
अकरावी सीईटीचे संकेतस्थळ हे 20 जुलै पासून सुरु करण्यात आले होते, मात्र सुरुवातीपासून त्यात त्रुटी असल्याने पहिल्या दोन दिवसात ते नीट चालत नसल्याने ते बंद ठेवण्याचा निर्णय मंडळाने घेतला होता. त्या दोन दिवसांच्या कालावधी दरम्यान दीड लाखाहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी पूर्णही झाली होती तर उर्वरित तितक्याच विद्यार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया अर्धवट होती, या सर्व विद्यार्थ्यांची नोंदणी आज पूर्ण झाल्याने सायंकाळपर्यंत आतापर्यंत अकरावी सीईटीसाठी एकूण 4 लाख 92 हजार 21विद्यार्थ्यांची नोंदणी पूर्ण झाली असल्याची माहितीही पाटील यांनी दिली.
आज दुपारी सुरू झालेले सीईटीचे संकेतस्थळ अत्यंत सुरळीतपणे चालत असून त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांना दिवसभरात त्रास झाला नाही. त्यामुळेच आजच्या पहिल्या पाच तासांमध्ये 2 लाख विद्यार्थ्यांना आपली नोंदणी पूर्ण करता आली. त्यामुळे ही नोंदणीची प्रक्रिया अशीच राहिल्यास पुढील चार दिवसात राज्यातील सर्व विद्यार्थ्याना आपली नोंदणी लवकर पूर्ण करता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अकरावी सीईटीच्या बंद पडलेल्या वेबसाईट संदर्भात राज्यभरातून टीका सुरू झाली होती. त्याच दरम्यान मंडळाने आपली तयारी सुरू करत काल रात्री उशिरा ही वेबसाईट सुरू करणार असल्याची घोषणा केली व त्यासाठीच एक परिपत्रक जारी केले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.