सोनसाखळी चोरांमुळे दिवाळीत महिलांनो सावधान 

सोनसाखळी चोरांमुळे दिवाळीत महिलांनो सावधान 

नवी मुंबई : सणासुदीचा हंगाम म्हणजे महिलांसाठी दागिने घालून मिरवण्याचे दिवस, पण महिलांनो सावधान! कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर नवी मुंबईतून सोनसाखळी चोर गायब झाले होते. मे महिन्यात तर अशा एकाही गुन्ह्याची नोंद झाली नव्हती. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर ते पुन्हा सक्रिय झाले आहेत. एकट्या महिलांना लक्ष करून त्यांनी सोनसाखळ्या खेचण्यास सुरुवात केल्याने पोलिसांची पुन्हा डोकेदुखी वाढली आहे. या पार्श्‍वभूमीवर त्यांनी जनजागृतीलाही सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे पोलिस आयुक्तांनाही अशा वाढत्या गुन्ह्यांना गांभीर्याने घ्यावे लागले आहे. 

कोरोनामुळे मार्च महिन्यात लॉकडाऊन लागू करण्यात आल्यानंतर सोनसाखळी चोर गायब झाले होते. त्यामुळे पोलिसांना दिलासा मिळाला होता. मात्र, कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी तुरुंग प्रशासनाने जुलैमध्ये हजारो कैद्यांना तात्पुरत्या जामिनावर सुटका केली. यामध्ये सराईतसुद्धा मुक्त झाल्याने त्यांनी पुन्हा सोनसाखळी चोरीला सुरुवात केल्याचे काही गुह्यांमध्ये आढळून आले आहे. त्यामुळे वाशी पोलिसांनी काही दिवसांपासून अशा चोरांपासून नागरिकांनी सावध राहवे, अशा आशयाचे फलक ठिकठिकाणी लावले आहेत. 

सध्या सणासुदीचे दिवस आहेत. त्यामुळे महिला मोठ्या संख्येने दागिने घालून बाहेर पडतात. त्यामुळे सोनसाखळी चोरीच्या घटना वाढण्याची शक्‍यताही पोलिसांनी वर्तवली असून त्यांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. 

31 सप्टेंबरला सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास बेलापूर गावात घडलेल्या घटनेत भाजी आणण्यासाठी गेलेल्या प्रतिभा भिसे (45) या महिलेची 30 हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी मोटरसायकलवरून आलेल्या दोघा लुटारूंनी काही मिनिटांमध्ये खेचून पलायन केले. त्यानंतर गत 2 ऑक्‍टोबरला घणसोलीत ठाकूर रेसिडेन्सी इमारतीच्या आवारात घडलेल्या घटनेत एका लुटारूने इमारतीत प्रवेश करून लिफ्टची वाट पहात उभ्या असलेल्या मंजुळा म्हात्रे या 55 वर्षीय महिलेच्या अंगावरील तब्बल 1 लाख 12 हजार रुपये किमतीचे दागिने लुटले. त्यानंतर बाहेर मोटरसायकल घेऊन उभ्या असलेल्या साथीदारासह पलायन केले. तर 5 ऑक्‍टोबरला उलवे सेक्‍टर-2 मध्ये घडलेल्या घटनेत शारदा अहिरे (43) या महिलेच्या गळ्यातील 60 हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी खेचून मोटरसायकलवर पलायन केले. 21 ऑक्‍टोबरला लुटारूनी घणसोली सेक्‍टर-7 मध्ये वंदना यादव (45) या महिलेचे 45 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र खेचून नेले. 24 ऑक्‍टोबरला सीवूड्‌स भागात घडलेल्या घटनेत सुभद्रा भांड या 60 वर्षीय महिलेच्या गळ्यातील 30 हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण मोटारसायकलवरून आलेल्या दोघा लुटारूंनी पळवले. या काही प्रमुख घटनांसह अन्य काही घटना गेल्या दोन महिन्यात घडल्या आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com