रायगडमध्ये अतिवृष्टीची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

प्रमोद जाधव
Monday, 21 September 2020

रायगड जिल्ह्यात येत्या 24 तासांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

 

अलिबाग : रायगड जिल्ह्यात येत्या 24 तासांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यानुसार नदीच्या परिसरातील नागरिकांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

खासगीत पॉझिटिव्ह अन सरकारी रुग्णालयात निगेटिव्ह; विश्वास कोणत्या अहवालावर ठेवायचा? रुग्णासमोर प्रश्न

जिल्ह्यात सोमवारी दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. सायंकाळी सहानंतर रिमझिम पाऊस झाला. मात्र, मंगळवारी अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. आवश्यक असल्यास घराबाहेर पडावे. पुराच्या पाण्यातून वाहने चालवू नयेत. विद्युत खांब व अन्य इलेक्ट्रीक वस्तूंना हात लावू नये.

माणकोली उड्डाणपुलाची मार्गिका वाहनांसाठी खुली; मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

दरडग्रस्त, सखल भागातील नागरिकांनी योग्य वेळी सुरक्षित ठिकाणी जाऊन स्थलांतर करावे. अशा वेळी नागरिकांनी घाबरून न जाता स्थानिक प्रशासनाला सहकार्य करावे. असे आवाहन केले आहे. 

-------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे ) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chance of heavy rains in Raigad District Collector appeals to the citizens to remain vigilant