उल्हासनगर - स्टेशनच्या बाजूला थाटण्यात आलेल्या अनधिकृत पार्किंगचा गाशा उल्हासनगर महानगरपालिकेने गुंडाळल्यावर चांदीबाई कॉलेजच्या रोडवरील अनधिकृत पार्किंगवर वर मालमत्ता विभाग, वाहतूक पोलीस आणि प्रभाग समिती कार्यालयाने धडक देऊन 200 दुचाक्यांवर कारवाई केली आहे. यासोबतच या रोडवरील अतिक्रमणांवर देखील कारवाई करण्यात आल्याची माहिती मालमत्ता विभागाचे सहायक आयुक्त अजय साबळे यांनी दिली.
महानगरपालिकेने अनधिकृत पार्किंगच्या विरोधात धडक मोहीम हाती घेतली असून त्याअनुषंगाने उल्हासनगर, शहाड, विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाजवळील पार्किंगवर कारवाई करण्यात आली होती. दोन तीन महिन्यांपूर्वी उल्हासनगर पश्चिम स्थानकाच्या बाजूला असलेल्या पार्किंवर पालिकेने कारवाई करून पालिकेच्या अधिकृत ठेकेदाराला ही पार्किंग पे अँड पार्क साठी मोकळी करून दिली होती.
मात्र चक्क चांदीबाई कॉलेज समोरील रोडवर अनधिकृत पार्किंग सुरू करण्यात आल्याची माहिती मिळताच सोमवारी 10 तारखेला मालमत्ता विभागाचे सहायक आयुक्त अजय साबळे, वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश भामरे, प्रभाग समिती 3 च्या सहायक आयुक्त सलोनी निवकर यांनी ही पार्किंग हटवून 200 दुचाक्यांवर कारवाई केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.