Bjp Vs Thackrey : मीच संपादक, माझाच मुलाखतकार, माझीच मुलाखत... ; चंद्रशेखर बावनकुळेंची ठाकरेंवर टीका

Chandrakant Bavankule and uddhav thackeray
Chandrakant Bavankule and uddhav thackeraysakal

Bjp Vs Thackrey : उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आज पॉडकास्टमध्ये निशाणा साधला. खासदार संजय राऊत यांनी ठाकरेंची मुलाखत घेतली. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले कि, "बऱ्याच वर्षांनंतर या देशात 'एनडीए' नावाचा काहीतरी अमिबा जिवंत आहे. त्यांच्या 'एनडीए'मध्ये आता ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआय हे तीनच पक्ष मजबूत आहेत". यावर आता भाजपने तिखट प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे.

यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट केले आहे. "हिंदुत्ववादी विचारांची ज्वलंत मशाल मिठी नदीत विझवून सोनिया गांधींच्या सेनेसमोर मुजरा करणारे उद्धव ठाकरे आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर टीका करत आहेत" असं म्हणत त्यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

Chandrakant Bavankule and uddhav thackeray
Raj Thackeray on Toll Plaza: म्हैसकर कुणाच्या जवळचे? अमित ठाकरेंवरील भाजपच्या टीकेनंतर राज ठाकरेंचा संतप्त सवाल

"मी, माझा पेपर, स्वकियांशी माझा झालेला सामना, मीच संपादक, माझाच मुलाखतकार, माझीच मुलाखत... भन्नाट!" असा टोला देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना लावला आहे.

घराणेशाही टिकवण्यासाठी एकत्र आलेल्या ‘इस्ट इंडिया‘ कंपनीचं कडबोळं आता लोकशाही टिकवण्याच्या गप्पा मारत आहेत. मी, माझं कुटुंब आणि माझा मुलगा एवढाच विचार करणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या तोंडून लोकशाही वाचवण्याच्या गप्पा ऐकणं म्हणजे मोठा विनोदच आहे.असेही बावनकुळे म्हणाले आहेत.

Chandrakant Bavankule and uddhav thackeray
Pune : लोकशाही ही केवळ मतदानासाठी नाही. लोकशाहीकडे नव्याने पाहणे गरजेचे; माजी प्रधान सचिव महेश झगडे

"घराणेशाही टिकवण्यासाठी एकत्र आलेल्या ‘इस्ट इंडिया‘ कंपनीचं कडबोळं आता लोकशाही टिकवण्याच्या गप्पा मारत आहेत. मी, माझं कुटुंब आणि माझा मुलगा एवढाच विचार करणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या तोंडून लोकशाही वाचवण्याच्या गप्पा ऐकणं म्हणजे मोठा विनोदच आहे" असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com