MLC Election 2022 | भाजपची नवी खेळी, बावनकुळे अजित पवारांच्या भेटीला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ajit pawar and chandrashekhar bawankule

MLC Election 2022 | भाजपची नवी खेळी, बावनकुळे अजित पवारांच्या भेटीला

महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या निवडणुकांमुळे वातावरण तापलं आहे. आज मतदान पार पडत असल्याने मागीत आठवड्यापासून नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. आतापर्यंत जवळपास 246 आमदारांचं मतदान झालं असून अद्याप काहींचं मतदान बाकी आहे. (MLC Election 2022)

राज्यसभेतील झालेल्या दगाफटका विधान परिषदेला होऊ नये यासाठी मविआकडून सावध पवित्रा घेण्यात आला आहे. त्यातून गुप्त मतदान पद्धती असल्याने एका उमेदवाराला किती आमदारांनी मत द्यायचे हे मुख्यमंत्री शेवटच्या क्षणाला ठरवणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणी मविआची रणनीती बदलण्याची शक्यता आहे. दूध पोळलं तर ताक पण फुकून पितो, असं अजित पवार म्हणाले. सध्या आपापल्या पद्धतीने तयारी करावी शेवटच्या क्षणी मी आदेश देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे, असं अजित पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, भाजपने नवी खेळी खेळल्याचं म्हटलं जातंय. कारण चंद्रशेखर बावनकुळे ऐनवेळी अजित पवारांच्या भेटीला गेले आहेत.

हेही वाचा: हे नेते फक्त सत्तेसाठी एकत्र, मतदानासाठी पोहोचताच दिलीप मोहितेंची नाराजी

अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस सकाळपासूनच विधानभवनातील दालनात ठिय्या देऊन बसले आहेत. दोघांनी आपापलया आमदारांची समीकरणं जुळवायला सुरुवात केली.

यातच भाजपच्या गोटातून महत्वाची माहिती समोर आली आहे. माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवारांची भेट घेतली. बंद दाराआड चर्चा झाल्याने अद्याप यातील तपशील समोर आलेला नाही. मात्र, बावनकुळेंनी अचानक भेट घेतल्याने राजकीय चर्चा रंगल्या आहेत. ही भेट वयक्तिक कामासाठी असल्याचं बावनकुळे म्हणाले. मतदारसंघातील कामांसाठी अजित दादांची भेट घेतल्याचं त्यांनी सांगितलं.

Web Title: Chandrashekhar Bawankule Meets Ajit Pawar Over Mlc Election 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top