पनवेलमध्ये 'लॉकडाऊन'च्या निर्बंधात पुन्हा 'बदल', असे असतील नवे नियम

panvel
panvel

पनवेल : लॉकडाऊन लागू करण्यात येऊनही भाजीपाला व किराणा खरेदीच्या नावावर नागरिक घराबाहेर पडत असल्याने होणाऱ्या गर्दीमुळे प्रशासनाच्या निर्णयावर टीका होऊ लागल्याने पनवेल पालिका आयुक्तांमार्फत पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या नियमांत बदल करण्यात आले आहेत. भाजीपाला आणि किरणा मालाची दुकाने उघडी ठेवण्याचा निर्णय फिरवत केवळ घरपोच सेवा देण्याच्या अटीवरच किराणा व भाजीपाला विक्री करण्याची परवानगी देणारी नवी अट पालिकेमार्फत लादण्यात आल्याने किराणा दुकानदार आणि भाजीपाला विक्रेत्यांना आता काऊंटर विक्री करण्यात बंदी घालण्यात आली आहे.

पनवेल पालिका हद्दीत सुरू असलेला कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पालिका प्रशासनाच्या वतीने 13 ते 14 जुलैदरम्यान 10 दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. प्रशासनाच्या वतीने लॉकडाऊनबाबत घेण्यात आलेल्या निर्णयादरम्यान जीवनावश्यक वस्तू पुरवण्याच्या नावाखाली किरणा सामान पुरवणारी दुकाने, भाजीपाला विक्री, खाद्यपदार्थ विक्रीला परवानगी देण्यात आल्याने लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतरही खरेदीच्या नावावर मोठ्या प्रमाणात नागरिक घराबाहेर पडत असून, लॉकडाऊनचे नियम पायदळी तुडवत असल्याचे पाहायला मिळाल्याने दुकाने सुरू ठेवण्याच्या प्रशासनाच्या निर्णयावर चोहो बाजूने टीका होऊ लागल्याने आयुक्त सुधाकर देशमुख यांनी लॉकडाऊनच्या नियमांत बदल करत किराणा सामान व भाजीपाला व्यावसायिकांना काऊंटर सेल करण्यास बंदी घालत केवळ घरपोच सेवा सुरू ठेवण्याची परवानगी दिल्याची माहिती पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. 

असे असतील नवे नियम 
भाजीपाला, अन्नधान्य, अंडी, फळे, बेकरी, दूध, चिकन-मटण व इतर जीवनावश्यक वस्तू काऊंटर विक्री न करता सकाळी 9 ते सायंकाळी 9 पर्यंत घरपोच पोहचवता येणार आहेत. 

  • दूध डेरी - सकाळी 5 ते रात्री 10
  • औषध दुकाने- सकाळी 9 ते सायंकाळी 10 पर्यंत केवळ औषधं विक्री करता येणार. 
  • पिठाची गिरणी- सकाळी 9 ते सायंकाळी 10
  • रेस्टॉरंट व किचन- सकाळी 10 ते रात्री 10

Changes in the rules of lockdown in Panvel read full story

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com