चाकरमान्यांना दिलासा; तुतारी एक्सप्रेसच्या वेळेत बदल 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

गणेशोत्वाच्या काळात दादर-सावंतवाडी रोड या तुतारी एक्सप्रेसला प्रवाशांचा प्रचंड  प्रतिसाद मिळत आहे.

मुंबई : मध्य रेल्वे मार्गवरुन धावणारी तुतारी एक्सप्रेसच्या 22 ऑगस्ट ते 10 सप्टेंबरपर्यंत वेळेत बदल करण्यात आला आहे.  11003/11004 दादर-सावंतवाडी रोड-दादर गाडी दादर स्थानकातून रात्री 11.45 वाजता सुटणारी गाडी आता रात्री 12.10 वाजता सुटणार आहे. 

गणेशोत्वाच्या काळात दादर-सावंतवाडी रोड या तुतारी एक्सप्रेसला प्रवाशांचा प्रचंड  प्रतिसाद मिळत आहे. यासाठी 11003- 11004 दादर-सावंतवाडी-दादर तुतारी एक्सप्रेसला टु-टायर एसीचा एक, थ्री-टायर एसीचा एक,स्लीपर क्लासचे 7,जनरल क्लासचे 8 तर सेकण्ड क्लासचे 2 असे एकूण 19 कोच असणार आहेत. त्यामुळे गणेशोत्सवाकरिता कोकणात जाण्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मात्र, प्रवाशांची गर्दी पाहता मध्य रेल्वेकडून 22 ऑगस्ट ते 10 सप्टेंबरपर्यंत (11003) तुतारी एक्सप्रेस दादर स्थानकातील फलाट क्र. 5 वरून रात्री 12.10 वाजता सुटणार असून सावंतवाडी रोडला दुपारी 12.25 वाजता पोहचेल. तर परतीच्या प्रवासावेळी (11004) तुतारी एक्सप्रेस सायंकाळी 06.30 वाजता दादर स्थानकातील फलाट क्र.5 वर दाखल होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Changes in the timing of the Tutari Express