चोपड्यापूजन आता केवळ नावापुरते; बदलत्या युगामुळे संगणकाचे महत्त्व वाढले

शरद वागदरे
Sunday, 15 November 2020

गेल्या काही वर्षांत संगणकाच्या वाढलेल्या वापरामुळे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी व्यापाऱ्यांकडून होणारे चोपड्यापूजन आता केवळ नावापुरतेच राहिले आहे.

वाशी : गेल्या काही वर्षांत संगणकाच्या वाढलेल्या वापरामुळे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी व्यापाऱ्यांकडून होणारे चोपड्यापूजन आता केवळ नावापुरतेच राहिले आहे. संगणकाच्या वेगवेगळ्या प्रणालीमुळे आता क्‍लिकवर व्यवहार होतात. ते राखून ठेवले जात आहेत. त्यामुळे चोपड्यांचे महत्त्व कमी झाले आहे. मात्र तिच्या पूजेची परंपरा व्यापाऱ्यांनी कायम ठेवली आहे. 

हेही वाचा - पालिकेच्या दूर्लक्षामुळे नवी मुंबईत अनाधिकृत होर्डिंगबाजीला ऊत; फुकटे जाहिरातदार सुसाट -

नवी मुंबईतील पाच घाऊक बाजारपेठा आहेत. या ठिकाणी 10 ते 12 हजार व्यापारी असून तीन हजार कोटींपेक्षा जास्त आर्थिक उलाढाल होते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या व्यापाऱ्यांमध्ये चोपड्यापूजनाचे अन्यन्य महत्त्व आहे. बाजारपेठेत संगणक वापराचे प्रमाण वाढल्यानंतर चोपडी काहीशी अडगळीत पडली. पूर्वी दिवाळीत पाच ते सहा हजार रुपयांची चोपडी खरेदी होत असे, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. 

 

मागील काही वर्षांपासून चोपडी विक्री कमी झाली आहे. यापूर्वी पाच ते सहा हजार रुपयांची चोपडी खरेदी होत असे. आता व्यापारी संगणकाची पूजादेखील करतात. 
- कुणाल शाह,
स्वस्तिक बुक डेपो, एपीएमसी. 

 

 

चोपडीपूजनाचा एक वेगळा आनंद आहे. मित्र मंडळी, नातेवाईक, व्यापारी एकत्र येऊन हे पूजन करतात. हे पूजन मुहूर्त बघूनच केले जाते. दोन ते तीन तासांचे हे पूजन व्यापाऱ्यांना एक नवीन ऊर्जा देणारे ठरते. 

- हितेन जोशी,
व्यापारी, मसाला मार्केट, एपीएमसी. 

The changing time has increased the importance of computers in lakshmipujan

----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The changing time has increased the importance of computers in lakshmipujan