esakal | VIDEO: मुंबई एअरपोर्टवर तोबा गर्दी; फ्लाइट मिस झाल्यानं प्रवाशांना मनस्ताप
sakal

बोलून बातमी शोधा

VIDEO: मुंबई एअरपोर्टवर तोबा गर्दी; फ्लाइट मिस झाल्यानं प्रवाशांना मनस्ताप

प्रवाशांनी आपली फ्लाईट मिस होण्याला मोठी गर्दी हाताळू न शकलेल्या यंत्रणेला जबाबदार ठरवलं आहे. मोठ्या संख्येने प्रवासी लांबच लांब रांगांमध्ये अडकून राहिल्याचं चित्र होतं.

VIDEO: मुंबई एअरपोर्टवर तोबा गर्दी; फ्लाइट मिस झाल्यानं प्रवाशांना मनस्ताप

sakal_logo
By
विनायक होगाडे

मुंबई : देशातील सर्वांत मोठ्या आणि महत्त्वाच्या एअरपोर्टपैकी मुंबई एअरपोर्ट एक आहे. आज मुंबई एअरपोर्टवर तुफान गर्दी पहायला मिळाली. मोठ्या संख्येने जमाव आणि गोंधळाचं वातावरण पहायला मिळालं. प्रवाशांनी आपली फ्लाईट मिस होण्याला मोठी गर्दी हाताळू न शकलेल्या यंत्रणेला जबाबदार ठरवलं आहे. मोठ्या संख्येने प्रवासी लांबच लांब रांगांमध्ये अडकून राहिल्याचं चित्र होतं. डोमेस्टीक एअरलाईन्स कंपनी इंडिगोने प्रवाशांना सुरक्षेच्या तपासासाठी आवश्यक वेळ मिळण्यासाठी लकवर रिपोर्ट करण्याचा सल्ला दिला आहे. तर काही फ्लाईट्स उशीरा सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा: ...अन् भल्या पहाटे अजित पवार धरणाच्या मधोमध अडकले!

एअरपोर्टवरील एका अधिकाऱ्याने सांगितलंय की, सण-समारंभांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या संख्येमध्ये मोठ्या संख्येने वाढ झाली आहे. एअरपोर्टवर अतिरिक्त सुरक्षारक्षकांना तैनात करण्यात आलं आहे. आम्ही आमच्या सुरक्षेमध्ये कसलीही कसर सोडू इच्छित नाहीये. सुरक्षा तपासणीमुळे ही गर्दी वाढली आहे. आम्ही लवकरच एक वक्तव्य प्रसिद्ध करु.

नाराज प्रवाशांनी सोशल मीडियावर मात्र आपला संताप व्यक्त करुन दाखवला आहे. गायक विशाल दादलानीने आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय की, मुंबई एअरपोर्टवर सध्या गोंधळांचं वातावरण आहे. असं वाटतंय की आम्ही मागच्या कोणत्यातरी युगात आहोत. लोकांची भरमसाठ गर्दी आहे. मशीन्स काम करु शकत नाहीयेत. सगळीकडे अव्यवस्था दिसून येत आहे. कर्मचारी आपल्या परिने योग्यरितीने काम करत आहेत मात्र तरीही ते गर्दीला नियंत्रित करु शकत नाहीयेत. ही अव्यवस्था कशामुळे पसरलीये, कृपया त्यांना टॅग करा.

loading image
go to top