esakal | "चेस द व्हायरस"! मीरा भाईंदर शहराचा कोरोना नियंत्रणासाठी अॅक्शन प्लॅन तयार
sakal

बोलून बातमी शोधा

"चेस द व्हायरस"! मीरा भाईंदर शहराचा कोरोना नियंत्रणासाठी अॅक्शन प्लॅन तयार

कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी मीरा भाईंदर शहरातदेखील 'चेस द व्हायरस' मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहीमे अंतर्गत महापालिकेच्या आरोग्य पथकाकडून घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येणार असून संशयितांची तात्काळ चाचणी घेण्यात येणार आहे.

"चेस द व्हायरस"! मीरा भाईंदर शहराचा कोरोना नियंत्रणासाठी अॅक्शन प्लॅन तयार

sakal_logo
By
संदीप पंडित


भाईंदर ः कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी मीरा भाईंदर शहरातदेखील 'चेस द व्हायरस' मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहीमे अंतर्गत महापालिकेच्या आरोग्य पथकाकडून घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येणार असून संशयितांची तात्काळ चाचणी घेण्यात येणार आहे. कोरोना नियंत्रण उपायोजना संदर्भात आमदार प्रताप सरनाईक यांनी आयुक्त डॉ. विजय राठोड यांची भेट घेऊन चर्चा केली त्यावेळी आयुक्तांनी याबाबत माहिती दिली.

मोठी बातमी : २६ जुलैपासून सुरु होणार अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया, 'असे' आहेत प्रवेशासाठीचे तीन टप्पे

कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा कोरोनाच्या संशयित रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार सुरु करण्याची मोहीम मुंबईत सुरु करण्यात आली आहे. धारावीमध्ये हा उपक्रम यशस्वी ठरला आहे. या पार्श्वभुमीवर मीरा भाईंदरमध्येही ही मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरात साडेपाच हजाराहून अधिकजणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे आणि सध्या १२६९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. रुग्णसंख्या दररोज रुग्णसंख्या वाढत असल्याने यावर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिकेने चेस द व्हायरस अर्थात कोरोनाचा पाठलाग ही मोहीम हाती घेतली आहे.

मुंबईसह उपनगरात दमदार पाऊस, जाणून घ्या पावसाचे प्रत्येक अपडेट्स

यासाठी महापालिकेकडून घरोघरी आरोग्य पथके पाठविण्यात येणार आहेत. संशयित रुग्णांची तपासणी करुन आवश्यकता वाटल्यास त्यांची रॅपीड अँटिजेन टेस्ट कीटद्वारे तात्काळ तपासणी करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत महापालिकेला शासनाकडून ४ हजार कीट्स प्राप्त झाली आहेत तसे आणखी १० ह्जार कीट्स मंगळवारी प्राप्त होत आहेत. याशिवाय व्यापक तपासणी मोहीमेसाठी एकंदर १ लाख कीट्स मागविण्यात आली आहेत. या कीट्स चा वापर करण्यासंदर्भात आरोग्य कर्मचार्‍यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे अशी माहिती आयुक्त डॉ विजय राठोड यांनी दिली आहे.

संकटांना आवरा हो ! कोरोनासोबत मलेरियाच्या वाढत्या रुग्णांनी पालिकेची चिंता वाढवली

शासनाने मान्यता दिल्यानंतरही मीरा भाईंदर महानगरपालिकेने १ हजार खाटांचे तात्पुरते कोवीड रुग्णालय सुरु करण्याबाबत कोणतीही हालचाल न केल्याने आमदार प्रताप सरनाईक यांनी आयुक्त दालनाबाहेर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यावर मीरा रोड येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मैदान येथे रुग्णालय उभारणी संदर्भात निविदा प्रसिद्ध करण्यात आली असल्याची माहिती प्रशासनाकडून सरनाईक यांना देण्यात आली आहे.

loading image