बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र उद्धव ठाकरे यांची संपत्ती किती ? वाचा...

सकाळ वृत्तसेवा
Monday, 11 May 2020

महाराष्ट्राचे CM उद्धव ठाकरे यांनी आज सहकुटुंब जात विधानपरिषद निवडणुकीचा उमेदवारी भरला. उद्धव ठाकरे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरताना अर्ज भरताना आपल्या संपत्तीचे विवरण दिले आहे

मुंबई - आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान परिषद निवडणुकांसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. महाविकास आघाडीत काँग्रेस पक्षाकडून २ उमेदवार निवडणुकीत उतरवण्यासाठी दबावतंत्राचा अवलंब करण्यात आला. मात्र उद्धव ठाकरेंचा मेसेज गेल्यानंतर कोरोनाच्या संवेदनशील स्थितीत राजकारण करणं योग्य नसल्याचं दिसून आलं. काँग्रेसने १ जागेवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. या सर्व घटना आणि घडामोडींनंतर सर्वांची नजर होती ती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारी अर्जाची आणि फॉर्म भरताना त्यामध्ये नमूद करण्यात येणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या संपत्तीची.  

अरेच्चा! भाजी धुतली चक्क वॉशिंग मशीनमध्ये 

महाराष्ट्राचे CM उद्धव ठाकरे यांनी आज सहकुटुंब जात विधानपरिषद निवडणुकीचा उमेदवारी भरला. उद्धव ठाकरे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरताना अर्ज भरताना आपल्या संपत्तीचे विवरण दिले आहे. हे विवरण अद्याप निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर मात्र प्रसिद्ध करण्यात आलेलं नाही. मात्र काही सूत्रांकडून आता उद्धव ठाकरे यांच्या संपत्तीचे आकडे समोर आलेत. सूत्रांकडून समोर येणाऱ्या माहितीत उद्धव ठाकरे यांच्याकडे साधारणतः १२५ कोटींची संपत्ती आहे. 

आईच्या दुधापासून तयार होऊ शकते कोरोनाच्या अँटीबॉडीज ?

उद्धव ठाकरे यांच्या नावावर दोन घरं आहेत. मातोश्री आणि मातोश्री २ ज्याचं बांधकाम सध्या सुरु आहे. महत्त्वाची बाब म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या स्वतःच्या नावावर एकही वाहन नाही. उद्धव ठाकरे यांचं कर्जतमध्ये एक फार्म हाऊस आहे. उद्धव ठाकरे यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत हा त्यांना विविध शेअर्स आणि त्या माध्यमातून मिळणारा डिव्हीडंट आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे चल आणि अचल मिळून एकूण साधारणतः 125 कोटींची संपत्ती असल्याचं त्यांनी जाहीर केलंय.

आपली संपत्ती जाहीर करणारे उद्धव ठाकरे हे सुपुत्र आदित्य ठाकरे यांच्यानंतर दुसरे ठाकरे ठरलेत.   

check how much property uddhav thackeray has uddhav thackeray filled form for MLC election and declared his assets


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: check how much property uddhav thackeray have UT filled form for MLC election and declared assets