esakal | एक पावसाळी रात्र अन् होत्याचं नव्हतं झालं... गोरसे कुटुंबावर शोककळा
sakal

बोलून बातमी शोधा

गोरसे-कुटुंब

एक पावसाळी रात्र अन् होत्याचं नव्हतं झालं... गोरसे कुटुंबावर शोककळा

sakal_logo
By
समीर सुर्वे

"सफाई कर्मचारी गोरसे मुलींच्या शिक्षणासाठी प्रचंड कष्ट करत होते..."

चेंबूर: मुंबईच्या चेंबूर परिसरात शनिवारी रात्री जोरदार पाऊस कोसळला. या पावसाने केवळ जनजीवन विस्कळीत केले नाही तर अनेकांचे संसार, कुटुंब उद्ध्वस्त केली. नवरा, बायको आणि तीन मुली असं सुखाने नांदणारे गोरसे कुटुंब या परिसरात राहायचं. एका पावसाळी रात्रीने त्या कुटुंबासाठी सारं 'होत्याचं नव्हतं' केलं. सफाई कामगार म्हणून काम करणारे पंडित गोरसे यांनी आपल्या मुलींना शिक्षण देऊन सुजाण व सुशिक्षित नागरिक बनवण्याचा विडा उचलला होता. त्यासाठी पंडित गोरसे दिवसरात्र राबत होतो. पण आज अखेरीस पंडित गोरसे यांना त्यांच्या कुटुंबासह मृत्यूने गाठले. स्वत: पंडित गोरसे, पत्नी छाया आणि मोठी मुलगी पल्लवी, प्रतिलेशा, प्राची गोरसे यांच्यावर काळाने घाला घातला. (Chembur Wall Collapsed Incidence Heavy Rainfall in Mumbai Gorse Family Unfortunately Mother Father 3 Daughters Died)

पल्लवी दुपारगडे (४४), प्रतिलेशा गोरसे (१८) आणि प्राची गोरसे (१५)

पल्लवी दुपारगडे (४४), प्रतिलेशा गोरसे (१८) आणि प्राची गोरसे (१५)

मध्यरात्री दरड कोसळून माणसांबरोबर अनेक स्वप्नही मेली. वस्ती धोकादायक आहे पण मुंबईत राहिल्यावर मुलींचं शिक्षण चांगलं होईल, या विचाराने गारेसे कुटूंबीय मृत्यूच्या सावटाखाली राहत होते. हसती, खेळती घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली आणि दगडांखाली गाडली गेली. वडिल पंडित गोरसे (५०), आई छाया (४७), मोठी मुलगी पल्लवी दुपारगडे (४४), प्रतिलेशा गोरसे (१८) आणि प्राची गोरसे (१५) या तिन्ही मुली यांचा जीवनप्रवास दुर्दैवाने या ढिगाऱ्याखाली संपला.

मृतांची यादी

मृतांची यादी

गोरसे यांचा भाचा नागेश ढवळे तेथून जवळच राहायला आहे. पहाटे या दुर्घटनेची माहिती मिळाल्यावर तो घटनास्थळी पोहचला. त्याने सांगितले, "तिन्ही मुलींना खुप शिकवायची मामाची इच्छा होती. त्यासाठी तो राबत होता. सफाई कामाबरोबरच अधिकचे मिळेल ते काम मामा करत होता. मुलींना शिक्षणात काही कमी पडू नये म्हणून दिवसाची रात्र करत होता. पण, त्यांची सर्व स्वप्न या ढिगाऱ्याखाली गाडली गेली."

गोरसे कुटुंबीयांवर निसर्गाने काळाचा घाला घातल्यानंतर त्यांचे धाकटे बंधू नवनाथ हे राजावाडी रूग्णालयात होते. अशी घटना व्हायला नको होती असं म्हणत ते भावनिक झाल्याचेही दिसले.

(संपादन- विराज भागवत)

loading image