Dombivli MIDC Blast: डोंबिवली MIDCला आहे भीषण स्फोटांचा मोठा इतिहास, याआधी कधी-कधी झालेले भीषण ब्लास्ट? वाचा Timeline

Dombivli MIDC Blast: डोंबिवली एमआयडीसी फेज- २ येथील इंडो अमाईन्स व माजदे कंपनीत पुन्हा मोठा स्फोट झाला आहे. अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही.
Dombivli MIDC Blast
Dombivli MIDC BlastEsakal

डोंबिवली: डोंबिवली एमआयडीसी फेज- २ येथील इंडो अमाईन्स व माजदे कंपनीत पुन्हा मोठा स्फोट झाला आहे. अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. मात्र अनेकजण कारखान्यात काही जण अडकल्याची भिती आहे. मोठे स्फोट या कंपनीत होत आहेत. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल आहेत. आग विझवण्याचे काम सुरु आहेत.

एक महिन्यापूर्वी डोंबिवली एआयडीसीमध्ये मोठा स्फोट झाला होता. हा स्फोट एवढा भीषण होता की या परिणाम आजूबाजूच्या परिसरावर देखील झाला होता. अनेक नागरिकांचा मृत्यू झाला होता तर ६० जण जखमी झाले होते यामध्ये लहान मुलांचा देखील समावेश होता. दरम्यान डोंबिवली एआयडीसीमध्ये स्फोटांची मालिका सुरुच आहे. त्यामुळे सरकारच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.

एमआयडीसीतील आगी

२२ ऑक्टोबर २००९ :

रासायनिक प्रक्रियेदरम्यान बाटली फुटल्याने फाइन ऑरगॅनिक रासायनिक कंपनीत आग. कंपनीचे मोठे नुकसान.

१८ मार्च २०११ :

एमआयडीसीतील घरडा केमिकल्स या सर्वांत मोठ्या रासायनिक कंपनीच्या प्रकल्पाला दुपारी दीडच्या सुमारास आग. दोन कामगारांचा होरपळून मृत्यू, दोन कामगार व एक अभियंता जखमी.

२२ सप्टेंबर २०११:

एमआयडीसीतील पिंपळेश्वर मंदिराजवळ कपड्यांवर प्रक्रिया करणाऱ्या विनायक टेक्स्टाईल प्रोसेसिंग आणि प्रिंटिंग कंपनीला आग. दोन कामगारांचा होरपळून मृत्यू.

Dombivli MIDC Blast
Dombivli MIDC Blast : एमआयडीसीमध्ये मोठा स्फोट, परिसर हादरला, कित्येक जण जखमी | Video Viral

२८ नोव्हेंबर २०११ :

एमआयडीसी फेज-२ मधील अमाईन केमिकल कंपनीत आग. कंपनीचे मोठे नुकसान.

२५ नोव्हेंबर २०१२ : शारदा

सिंथेटिक्स या कंपनीला आग. कपड्यांचा लाखो रुपयांचा कच्चा माल खाक

१२ मे २०१३ :

एमआयडीसी फेज-२ मधील हेयर डाय कंपनीला आग. एकाचा मृत्यू.

१३ मे २०१३: गॅस

सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे केम स्टार कंपनीत भीषण आग. एका कामगाराचा मृत्यू.

Dombivli MIDC Blast
Dombivli MIDC Blast : एमआयडीसीमध्ये मोठा स्फोट, परिसर हादरला, कित्येक जण जखमी | Video Viral

१० नोव्हेंबर २०१३:

खंबाळपाडा रस्त्यालगतच्या सन बीम मेनोकेम या रासायनिक कंपनीत आग. लाखो रुपयांचा कच्चा माल खाक.

१८ डिसेंबर २०१४ :

औरेक्स कंपनीत रात्री साडेबाराच्या सुमारास आग. औषधे बनवण्यासाठी लागणाऱ्या टोलविन या रसायनाच्या साठ्यामळे आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले.

३० जानेवारी २०१५ :

एमआयडीसी फेज-२ मध्ये शनी मंदिराच्या मागे असलेल्या नार्केम कंपनीला मध्यरात्री १ च्या सुमारास आग. ती विझवण्यासाठी कल्याण, अंबरनाथ, भिवंडी, नवी मुंबईतून अग्निशमन दलाचे बंब मागवावे लागले होते.

२४ मे २०१६ 

प्रो बेस एंटरप्रायझेस या डोंबिवली एमआयडीसीतील कंपनीत सकाळी ११.३० च्या सुमारास बॉयलरचा स्फोट झाला होता. हा स्फोट इतका जबरदस्त होता, की शेजारी असलेल्या सहा कारखान्यांचे यात मोठे नुकसान झाले होते. स्फोटाच्या भयावह आवाजाने संपूर्ण शहर हादरले. दोन-अडीच किलोमीटरपर्यंतची घरे तसेच दुकानांच्या काचा फुटल्या. या स्फोटात पाच जणांचा मृत्यू झाला होता १६० जण जखमी झाले होते.

२३ मे २०२४

अमूदान केमिकल कंपनी एमआयडीसी फेज 2 मध्ये आहे. या कंपनीत दोनच्या सुमारास बॉयलरचे लागोपाठ चार - पाच स्फोट झाले. या स्फोटामध्ये संपूर्ण कंपनी बेचराख झाली. यापूर्वी २४ मे २०१६  डोंबिवली एआयडीसीमध्ये मोठी आग लागली होती. त्यानंतर २३ मे २०२४ ला त्याची पुनरावृत्ती झाली. यात १७ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला होता. तर ६० हून अधिक गंभीर जखमी झाले होते.


12 जून २०२४

डोंबिवली एमआयडीसी फेज- २ येथील इंडो अमाईन्स व माजदे कंपनीत पुन्हा मोठा स्फोट झाला आहे. अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. मात्र अनेकजण कारखान्यात काही जण अडकल्याची भिती आहे. मोठे स्फोट या कंपनीत होत आहेत. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल आहेत. आग विझवण्याचे काम सुरु आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com