Mumbai Crime Update : चाकूने सपासप् वार करुन तिघांचा खून करणारा चेतन होता एकलकोंडा; शेजारी म्हणतात...

Mumbai Crime
Mumbai Crimeesakal

मुंबई : मुंबईतील ग्रँड रोड भागातील पार्वती मेन्शन या चाळीत राहणाऱ्या चेतन गाला या तरुणाचे शेजाऱ्यांशी किरकोळ वाद झाले होते. शाब्दिक चकमकीमुळं संतापलेल्या चेतन गालानं घरातून चाकू आणत पाच जणांवर सपासप वार केले. त्यानंतर आरडाओरडा झाल्यानंतर लोकांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी तातडीनं नायर रुग्णालयात दाखल केलं या प्रकरणातील मुख्य आरोपी चेतन गाला याच्या विरोधात नवनवीन माहिती समोर येत आहे.

घटनेबद्दल संभ्रम

या परिसरातील रहिवाशांनी दिलेला माहितीनुसार जेव्हा ही घटना घडली तेव्हा दुपारची वेळ होती. दुपारची वेळ असल्यामुळे दुपारच्या वेळी इमारतीत मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. शुक्रवारचा दिवस असल्यामुळे जास्त करून रहिवासी पुरुष आपल्या कामासाठी घराबाहेर पडल्यामुळे दुपारी फक्त महिला मोठ्या संख्येने इमारतीत असतात. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी येथील रहिवाशांना घरफोडी किंवा लूट झाल्याची संशय आला तसेच आरोपीने गुन्हा करून तो त्याच इमारतीत राहत असल्यामुळे आपल्या घरात जाऊन लपला त्यामुळे बराच वेळ नेमकं काय झालं हे समजलं नाही परंतु जखमी व्यक्तींनी जेव्हा आरोपीबद्दल सांगितले तेव्हा इतर रहिवाशांना माहिती मिळाली.

हेही वाचाः एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

आरोपी मानसिक तणावात?

चेतन गालाबद्दल जी माहिती मिळाली त्याप्रमाणे निलेश गा हा व्यक्ती एकलकोंडा असून त्याचं इमारतीतील इतर रहिवाशांशी कोणताही बातचीत किंवा संपर्क नसायचा.त्याचे फारसे कोणाशी पटत नसल्याचे येथील रहिवासी सांगतात. थोडक्यात तो आपल्याच जगात असायचा नाही इथे कोणाचा त्याच्याशी जास्त बोलण्यात आलेला ना त्याच्याशी संपर्क परंतु हा मान गाला याच्या वर्तनातून तो मानसिक तणावात असल्याचं रहिवाशांचं म्हणणं आहे

वाचवणाऱ्याचे गेले प्राण

मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणात चार पैकी दोन मृत व्यक्तीचे घर एकाच माळ्यावर आरोपीच्या घराच्या बाजूला होते. दोघांशी गाला याचा वाद होता. यांच्यामुळे आपली कुटुंबीय आपल्याला सोडून गेल्याचा त्याच्या मनात राग होता. सर्वात प्रथम हल्ला चेतन गाला याने दुसऱ्या माळावर आपल्या घराच्या बाजूला राहणाऱ्या या दोन व्यक्तींवरती केला जेव्हा या हल्ल्यामुळे एक गोंधळ झाला तेव्हा पहिल्या माळ्यावरून अजून दोघं वाचवण्यासाठी तिथे पोहोचली परंतु वाद मिटवायला आलेले असताना त्यांचाच या वादात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Mumbai Crime
क्लास वन अधिकारी, पाच लाखांची लाच अन् चौथ्या मजल्यावरुन उडी; गुजरातमधील घटनेने देश हादरला

...म्हणून मदत मिळाली नाही

येथील रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, या इमारतीच्या लगत असलेल्या रस्त्यावर मेट्रो रेल्वेचे काम सुरू आहे. त्यामुळे या इमारतीत जर प्रवेश करायचा झाल्यास व पन्नास मीटर चा वळसा मारून इमारतीत प्रवेश करावा लागतो. त्यामुळे जेव्हा दुपारी साडेतीन वाजता जेव्हा ही घटना घडली. तेव्हा घटना रोखण्यासाठी स्थानिकांना इमारतीत प्रवेश करायला काही उशीर झाल्यामुळे आरोपीला रोखण्यात त्यांना अपयश आले. येथील रहिवाशांचे म्हणण्याप्रमाणे जर मेट्रोचे काम नसते तर इमारतीत प्रवेश करायला सोपे झाले असते जेणेकरून ही घटना रोखता आली असती, अशी माहिती दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com