'त्या' प्रकरणात छगन भुजबळ यांनी केलेली याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली

chhagan bhujbal
chhagan bhujbalsakal media
Updated on

मुंबई : सन 2011 मधील एका मिळकतीबाबत आयकरचे फेरमूल्यांकन (Income tax reevaluation) करण्यासाठी आयकर विभागाने बजावलेल्या नोटीसीला (Income tax department notice) विरोध करणारी याचिका (petition rejected) मंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी केली होती. ही याचिका नुकतीच मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai high court) नामंजूर केली. सन 2012-13 मध्ये आयकर विभागाने भुजबळ यांना नोटीस बजावली होती. या वर्षीच्या उत्पन्नाबाबत फेर आढावा घेण्याची आवश्यकता आहे कारण आयकर कायदा कलम 147 नुसार काही उत्पन्नावरील आयकर जमा झालेला नाही, असे या नोटीसीमध्ये म्हटले होते.

chhagan bhujbal
"ओबीसींचे राजकारणातील अस्तित्वच संपविण्याचा ठाकरे सरकारचा कट"

या कलमानुसार जर आयकर अधिकार्यांना असे वाटले कि उत्पन्नाचा परतावा घेताना काही रक्कममध्ये सवलत दिली आहे तर त्या उत्पन्नाचे पुर्नमुल्यांकन होऊ शकते. भुजबळ यांनी या नोटीसीविरोधात उच्च न्यायालयात याचिका केली होती. याचिकेवर न्या के आर श्रीराम आणि न्या अमीत बोरकर यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. मे ते ऑक्टोबर 2011 मध्ये सुमारे तीन लाख रुपयांचे मिळकतीसाठी ही नोटीस बजावली होती. मात्र ही रक्कम का दडवली याचे कारण आयकर विभागाने केले नाही आणि अशाप्रकारचा व्यवहार दडविण्यात आला नाही, असा युक्तिवाद भुजबळ यांच्या वतीने करण्यात आला.

मात्र जेव्हा नोटीस पाठवली तेव्हा भुजबळ यांनी आक्षेप घेतला नाही. अचानक सन 2019 मध्ये त्यांनी याचिका दाखल केली, असा खुलासा आयकर विभागाने केला. खंडपीठाने भुजबळ यांचा युक्तिवाद अमान्य केला. आयकर विभाग त्यांच्या विशेष अधिकारात याची तपासणी करु शकतात आणि ते करण्यासाठी पुरेसे कारण त्यांच्याकडे आहे, असा निर्णय देत खंडपीठाने हस्तक्षेप करण्यास मनाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com