नाशिक : ‘‘मी शांत बसणार नाही, लढणारा आहे. विरोध करणाऱ्यांना ठणकावून सांगू. सध्याच्या घडामोडींबाबत विचारपूर्वक निर्णय घेणार आहे, अजिबात घाई करणार नाही. मंत्रिपदी नसलो तरी शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्याबरोबर असेन. सभागृहात तुमचा आवाज असेल,’’ असे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज येथे कार्यकर्त्यांना सांगितले.