मुंबई : भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळाने (आयआरसीटीसी), ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाला उजाळा देण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याचा अनुभव देण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे सर्किट’ (Chhatrapati Shivaji Maharaj Railway Circuit) या एका विशेष गाडीची घोषणा केली आहे. ही यात्रा भारत गौरव पर्यटक रेल्वे (Bharat Gaurav Tourist Train) अंतर्गत नऊ जूनपासून सुरू होत आहे.