Eknath Shinde: वन ट्रीलियन डॉलरचा गोल महाराष्ट्र गाठणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

Eknath Shinde
Eknath Shindesakal

Thane News: मुख्यमंत्र्यांनी जगभरातल्या तिसऱ्या क्रमांकावर भारताची अर्थव्यवस्था आणण्याचा संकल्प आहे. आपलं महाराष्ट्र त्यामध्ये वन ट्रीलियन डॉलर हा गोल अचिव करेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

कोकण विभागातील विविध गृहनिर्माण प्रकल्प अंतर्गत ५ हजार ३११ सदनिका विक्रीची संगणकीय सोडत शनिवारी ठाण्याच्या राम गणेश गडकरी रंगायताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काढण्यात आली. त्यावेळी त्यांनी हा विश्वास व्यक्त केला.

Eknath Shinde
Eknath Shinde: ..तर वर्षा निवासस्थानी लावला जाणार वडापाव-चहाचा स्टॉल

गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, माजी आमदार रवींद्र फाटक आणि भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हाडाच्या माध्यमातून आतापर्यंत नऊ लाख घरे दिल्याचे सांगून ही संख्या मोठी आहे. तसेच गिरणी कामगारांना ही घरे देण्यास सुरुवात केली आहे. मुंबई प्रमाणे ठाण्यातही गिरणी होती असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. ज्यांना लॉटरीमध्ये घरी मिळणार आहेत, त्यांचे अभिनंदन ज्यांना मिळणार नाहीत, त्यांचे सुद्धा अभिनंदन त्यांना दुसऱ्या लॉटरीत घरी मिळतील आणि त्यांचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होईल असेही यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.

Eknath Shinde
Uddhav Thackeray यांच्या रणरागिनीचा खरमरीत पत्र लिहित पक्षाला रामराम | CM Eknath Shinde | Shivsena

पंतप्रधान आवास योजना ही शहरी भागातच नाही तर ग्रामीण भागात ही सुरू आहे. त्यात सोलापुरात ३० हजार घरांची लॉटरी काढण्यात आली. शिवाय म्हाडावरील लोकांचा विश्वास वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. लॉटरी करताना पारदर्शकता असल्याचे सांगून येथे कोणाच्याही शिफारशीला वाव नाही. आपले हे सर्वसामान्यांचे सरकार असून दुजाभाव करणारे हे सरकार नाही म्हणून गेल्या दीड वर्षांमध्ये अनेक निर्णय आपल्या सरकारने घेतले.

दरम्यान, मग पायाभूत सुविधा असतील, त्यामध्ये अटल सेतू तसेच बाळासाहेब ठाकरे समृद्धी हायवे अशा प्रकारचे गेम चेंजर प्रकल्प तयार करून शकलो.

आज ठाण्यामध्ये देखील आपण बायपास करतोय आपण उड्डाणपूल करतोय अगदी शहराच्या बाहेरच्या बाहेरून मार्ग आपण काढतोय. हे वाहतूक कोंडी दूर व्हावी यासाठी अनेक प्रकल्प आपण हाती घेतोय असेही ते म्हणाले. त्यामुळे पायाभूत सुविधांचे प्रकल्प करणार आहे आपले राज्य देशातला पहिले राज्य आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

वेळेमध्ये जी घर पूर्ण करतील त्यांना बक्षीस द्या

म्हाडाचे प्रकल्प वेळेमध्ये प्रकल्प पूर्ण झाले पाहिजे काही प्रकल्प एवढे रिंगाळतात की त्या प्रकल्पाची चव निघून जाते आणि मग ते प्रकल्प पुन्हा त्यांना दुरुस्ती करावी लागते असे प्रकरण मुंबईमध्ये अनेक पाहिले. परंतु म्हाडामध्ये आता आपले सरकार आल्यानंतर सर्व वस्तूस्थिती बदललेली आहे. सर्व पॅटर्न बदललेला आहे आणि वेळेमध्ये ही घरे पूर्ण झाली पाहिजे, वेळेमध्ये जी घर पूर्ण करतील त्यांना बक्षीस द्या.

Eknath Shinde
CM Eknath Shinde : ''दोन-चार टकल्यांना घेऊन पक्ष मोठा होत नसतो'', एकनाथ शिंदेंचा रोख नेमका कुणाकडे?

ठाणेकरांनी भरभरून प्रेम केल्याने मुख्यमंत्री झालो

ठाण्यात लॉटरी असल्यामुळे मला जास्तीतजास्त आनंद आहे. तुम्ही ठाणेकरांनी मला भरभरून प्रेम केले. त्यामुळेच मी मुख्यमंत्री होऊ शकलो आहे, मी आपल्याला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो असे ते म्हणाले.

वेळेत पूर्ण करा अन्यथा बिल्डरांना दंड लावा

म्हाडाने वेळेत गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करून घ्यायला हवेत, अन्यथा प्रकल्प रेंगाळून पुन्हा त्यांची दुरुस्ती करण्याची वेळ येते. जे बिल्डर्स वेळेत प्रकल्प पूर्ण करतील, त्यांना बक्षीस द्यावे आणि जे मर्यादित वेळेत पूर्ण करणार नाहीत, त्या बिल्डरला दंड लावण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातील कोकण म्हाडाच्या लॉटरी समारंभात दिले.

Eknath Shinde
Eknath Shinde: मुख्यमंत्रांच्या हस्ते झिरो कॅश काऊंटर रुग्णालयाचे लोकार्पण!

आपलं सरकार  महाराष्ट्राचे ग्रोथ इंजिन

सुविधांचे प्रकल्प करणारे महाराष्ट्र हे राज्य देशातील पहिले राज्य आहे. तसेच परदेशी गुंतवणुकीमध्ये देखील आपलं राज्य आपलं सरकार यायच्या अगोदर दोन-तीन नंबर ने मागे गेले होते. पण जसे आपले सरकार आल्यानंतर सहा महिन्यांमध्ये पुन्हा महाराष्ट्र हे राज्य परदेशी गुंतवणूकीत पुन्हा पहिल्या नंबरवर आपण आणले. त्यामुळे हे सर्वसामान्यांचे आपलं सरकार  महाराष्ट्राचे ग्रोथ इंजिन आहे. असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी ठाण्यात पार पडलेल्या म्हाडा लॉटरी सोडती दरम्यान केले.

Eknath Shinde
Eknath Shinde: ठाकरेंनंतर मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्लात येणार पवारांचं वादळ!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com