esakal | chief-minister-uddhav-thackeray-addressing-people-maharashtra-429865

बोलून बातमी शोधा

पुढचे १५ दिवस संचारबंदी, लोकल, बस सेवा बंद करणार नाही - मुख्यमंत्री
पुढचे १५ दिवस संचारबंदी, लोकल, बस सेवा बंद करणार नाही - मुख्यमंत्री
sakal_logo
By
दीनानाथ परब

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेला संबोधित करत आहेत. मुख्यमंत्री काय निर्णय जाहीर करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. राज्यात दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. कोरोना रुग्णांचा हा वाढता आकडा नियंत्रणात आणण्यासाठी आता लॉकडाउन एक पर्याय उरला आहे. कोविड टास्क फोर्सने कोरोनामुळे होणारी रुग्णवाढ रोखण्यासाठी लॉकडाउनचा सल्ला दिला. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे.

उद्धव ठाकरेंच्या संबोधनातील महत्त्वाचे मुद्दे

- सर्वप्रथम मी गुढी पाडव्याच्या शुभेच्छा देतो.

- मागच्यावर्षी पुढच्यावर्षीचा गुढी पाडवा कोविड मुक्त असूं दे अशी प्रार्थना केली होती.

- डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीपर्यंत कोविडवर चांगलं नियंत्रण मिळवलं होतं.

- मधल्याकाळात युद्ध जिंकत आलोय असं वाटतं होतं. त्या युद्धाला पुन्हा सुरुवात झाली.

- आजचा रुग्णांचा आकाडा भीतीदायक आहे. आज ६० हजार २१२ कोविड पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद.

- आपली परीक्षा पुढे ढकलू शकत नाही. उत्तीर्ण व्हावच लागेल.

- ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन एकमत घडवण्याचा प्रयत्न करतोय.

- मतमतांतरावर कितीकाळ चर्चा करायची, हे आता परवडणारा नाही.

- आजची परिस्थिती अशी आहे की, १२०० मेट्रीक टन ऑक्सिजनचा उत्पादन होतं. आज १०० टक्के ऑक्सिजनचा वापर कोविडसाठी वापरतोय. ९५० टन ऑक्सिजन कोविड रुग्णांसाठी वापरतोय

- विचित्र परिस्थिती निर्माण झालीय. लष्करी तज्ज्ञांची मदत घेऊन हवाई मार्गाने ऑक्सिजन आणणे शक्य असेल तर एअर फोर्सच्या मदतीने ऑक्सिजन पोहोचवा. त्यासाठी पंतप्रधानांना पत्र लिहितोय.

- पुढच्या काळात लसीकरण वाढवावच लागेल. तरच तिसऱ्या, चौथ्या लाटेचा वेग कमी करता येईल.

- रुग्णवाढ अपेक्षित गतीने होतेय. आरोग्य सुविधा तोकडी पडताना दिसतोय.

- जिद्दीने लढायचं जिंकायचं म्हणजे जिंकायचचं.

- आरोग्य सुविधा वाढवतोय, जे करणं शक्य आहे ते करणार म्हणजे करणारच.

- निवृत्त डॉक्टर, नर्सेसना कोविड विरोधात लढण्यासाठी पुढे येण्याचं आवाहन.

- उणी-दुणी काढू नका, कारण महाराष्ट्र माफ करणार नाही.

- राजकारण बाजूला ठेवा. साथ म्हणत असू तर आपण एकसाथ लढलं पाहिजे.

- कडक पावलं उचलण्याची वेळ आणि क्षण आलाय.

- रोजी-रोटी बरोबर जीव महत्त्वाचा आहे. जीव वाचले तर सगळ काही आहे.

- निर्बंध लॉकडाउन सदृश्य आहेत.

- उद्या रात्री आठ वाजल्यापासून निर्बंध लागू होतील.

- पंढरपूर, मंगळवेढा मतदारसंघात मतदान असल्याने अपवाद करणार

- उद्यापासून ब्रेक द चेन साठी राज्यात १४४ कलम लागू करतोय.

- राज्यात पुढच्या १५ दिवसांसाठी संचारबंदी

- अतिआवश्यक काम नसेल, तर बाहेर पडू नका.

- मी कोरोनाला मदत करणार नाही, मी सरकारला मदत करणार.

- अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल, बस सेवा बंद करणार नाही.

- रुग्णालय, विमा, औषधी कंपन्या, लस उत्पादक, मास्क, सॅनिटायझर, शीतगृह कर्मचाऱ्यांसाठी सेवा सुरु राहणार.

- ई-कॉमर्स, अधिस्वीकृत पत्रकारांसाठी सुरु राहणार.

- बांधकाम उद्योग सुरु ठेवता येतील. कर्मचाऱ्यांची सोय त्याच ठिकाणी करा, कोरोनाचा संसर्ग होणार नाही याची काळजी घ्या.

- हॉटेल, रेस्टॉरंट यावर आधीप्रमाणेच निर्बंध, पार्सल सेवा सुरु.

- रस्त्यावरच्या विक्रेत्यांना परवानगी आहे. सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंत विक्री करता येणार

- 7 कोटी लोकांना 3 किलो गहू, 2 किलो तांदूळ

- शिवभोजन योजना दहा रुपयांची थाळी 5 रुपयांना केली होती. आता मोफत देण्यात येणार.

- रोजी मंदावणार पण रोटी थांबू देत नाहीय.

- राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना 1500 रुपये अर्थसहाय्य देणार. १२ लाख लाभार्थी आहेत.

- नोंदणीकृती घरगुती कामगारांना, अधिकृत फेरीवाल्याना १५०० रुपये देत आहोत. पाच लाख लाभार्थी आहेत.

- परवानाधारक रिक्षा चालकांना १५०० रुपये देत आहोत. १२ लाख लाभार्थी आहेत.

- खावटी योजनेचा लाभ घेणाऱ्या आदिवासी कुटुंबांना २ हजार रुपये आर्थिक सहाय्य. १२ लाख लाभार्थी.

- पाच हजार ४०० कोटी रुपये आधार देण्यासाठी बाजूला काढून ठेवला आहे.

- सध्याच्या घडीला दररोज ४० ते ५० हजारे इंजेक्शन वापरतोय. हीच परिस्थिती कायम राहिली तर एक लाख रेमडेसिवीर इंजेक्शन लागतील.

- बंधन एकतर्फी टाकलेली नाही. प्राण वाचवण हा बंधन टाकण्यामागचा उद्देश.