Lockdown: लॉकडाऊन संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान

Lockdown: लॉकडाऊन संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान
Updated on

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होताना दिसत आहे. याच दरम्यान राज्यात लॉकडाऊन संदर्भात बऱ्याच चर्चा रंगू लागल्या आहेत. अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील लॉकडाऊनसंबंधी मोठं विधान केलं आहे.  मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला सावधानतेचा इशारा दिला आहे. त्यासोबतच कोरोना संदर्भातील नियमांचे पालन जनतेनं करावं असं आवाहन केलं आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आपल्याला पहिल्यापासून सुरुवात करण्याची गरज लागू शकते, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. कोरोनाचा फैलाव वेगानं होताना दिसत आहे. त्यामुळे काही ठिकाणी लॉकडाऊन करावा लागेल, असं त्यांनी म्हटलं. दरम्यान येत्या दोन दिवसात प्रशासनासोबत बैठक घेऊन यावर निर्णय घेतला जाणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईतील जे जे रुग्णालयामध्ये जाऊन कोरोनाची लस घेतली. लस घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलत असताना महाराष्ट्रातील जनतेनंही कोरोनाची लस घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं आहे. 

मुख्यमंत्री म्हणाले की, मी विनंती करतो की जे पात्र आहेत त्यांनी लसीकरण करुन घ्यावं आणि सर्वाजनिक ठिकाणी नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी. तसंच सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे आणि हात धुणे हे नियम पाळावे लागतील. आपल्याला कदाचित पाहिल्यापासून सुरुवात करावी लागले. अजूनही परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही. ती जाऊ नये असं वाटत असेल तर ही बंधनं पाळणं अत्यावश्यक आहे.

Chief Minister Uddhav Thackeray big statement regarding Maharashtra lockdown

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com