esakal | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची 26/11 दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना आदरांजली
sakal

बोलून बातमी शोधा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची 26/11 दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना आदरांजली

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांच्या स्मृतीस आदरांजली वाहिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची 26/11 दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना आदरांजली

sakal_logo
By
तुषार सोनवणे

मुंबई - कष्टकरी कामगारांचे शहर तसेच देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी मुंबईकरांना वेठीस धरले होते. या हल्ल्याला आज 12 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांच्या स्मृतीस आदरांजली वाहिली.

हेही वाचा - मुंबईत मनसेच्या भव्य मोर्चाला सुरूवात; बाळा नांदगावकर यांचा सरकारला इशारा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाने यासंबधी ट्विट केले आहे. त्यात त्यांनी ''मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज २६/११ च्या हल्ल्यात दहशतवाद्यांशी लढताना प्राणार्पण केलेल्या शहीद पोलिसांच्या पवित्र स्मृतीस मुंबई पोलिस आयुक्तालय येथे पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली''.अशी माहिती दिली आहे. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोशारी, गृहमंत्री अनिल देशमुख, पर्यटन मंत्री अदित्य ठाकरे, मुंबई  पोलिसआयुक्त परमबीर सिंह आणि इतर पोलिस अधिकारी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा - खबरदार संपावर गेलात तर...! राज्य सरकारचा शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांना इशारा

 यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, गृहमंत्री अनिल देशमुख, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह, पोलिस अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

----------------------------------------------------------