"काँग्रेस-राष्ट्रवादीचा दबाव..."; सभेआधीच उद्धव ठाकरेंना मनसेचं आव्हान

शिवसंपर्क अभियानांतर्गत उद्धव ठाकरे यांची सभा आज होणार आहे. या सभेकडे राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे.
Raj Thackeray Uddhav Thackeray
Raj Thackeray Uddhav ThackeraySakal
Updated on

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena) गेल्या काही दिवसांपासून चांगलीच सक्रीय झाली आहे. मशिदींवरच्या भोंग्यांच्या विरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या (MNS Chief Raj Thackeray) भव्य सभेनंतर आता शिवसेनाही मोठी सभा घेत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं भाषण या सभेत आज संध्याकाळी होणार आहे. दरम्यान, मनसेने उद्धव ठाकरेंना (CM Uddhav Thackeray) एक आव्हान दिलं आहे.

मनसेचे प्रवक्ते गजानन काळे (MNS Spokesperson Gajanan Kale) यांनी यासंदर्भातलं ट्विट केलं आहे. उद्धव ठाकरेंना आव्हान देणाऱ्या या ट्विटमध्ये काळे म्हणतात, "उद्धवजी आपणास आवाहन... आदरणीय बाळासाहेब यांचं स्वप्न पूर्ण करा...मशिदींवरील भोंगे आणि रस्त्यावरील नमाज आम्ही बंद करू अशी घोषणा आज कराच… राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा दबाव झुगारण्याची हिंमत करा...टोमण्या पलिकडची आज कृती कराच... जय श्री राम...!"

गेल्या काही दिवसांपासून मशिदींवरील भोंग्याच्या मुद्द्यावरून मनसे चांगलीच आक्रमक झाली आहे. हाच मुद्दा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनीही मांडला होता, असं सांगत असताना मनसेने बाळासाहेबांच्या भाषणाचा एक व्हिडीओ शेअर केला होता. शिवसेनेने हा मुद्दा लावून धरावा, बाळासाहेबांच्या विचारांवर चालावं, असं मनसेकडून सातत्याने सांगितलं जात होतं. आज संध्याकाळी उद्धव ठाकरे यांची सभा मुंबईत होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून हे ट्विट करण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com