मुंबई: लोकल सेवा सुरु करणार का? मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

Uddhav Thackeray
Uddhav Thackeraysakal
Summary

मुंबई मनपाच्या एच. पश्चिम विभागातील कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी विरोधकांवर टीका करतानाच त्यांनी कोरोना मुद्द्यावर भाष्य केलं. एक नवीन संकट आलं आहे.

मुंबई मनपाच्या एच. पश्चिम विभागातील कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी विरोधकांवर टीका करतानाच त्यांनी कोरोना मुद्द्यावर भाष्य केलं. एक नवीन संकट आलं आहे. काही महिन्यांचा, दिवसांचा पाऊस काही तासांत पडत आहे. पूर परिस्थिती निर्माण होत आहे. मुंबईतच नाही तर जगभरात ही स्थिती आहे. तिकडच्या पालिका तर आमच्या ताब्यात नाहीत. चीनमध्ये पूर आला. तिथे आपली पालिका नाही तरी पूर आला. त्याला जबाबदार कोण? चिपळून, महाड, सातारा, सांगली, कोल्हापूर ठिकाणी पूर, दरड कोसळल्या. मुंबई पालिकेने तिकडेही मदतीची टीम पाठवली, असं मुख्यमंत्री म्हणाले. (Maharashtra latest marathi news)

महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी काळजी घेण्यासारखी परिस्थिती आहे. जिथे परिस्थिती चांगली आहे, तिथे निर्बंध शिथिल केले जात आहेत. जिथे शिथिलता देऊ शकत नाही, तिथे नाईलाज आहे. याचा अर्थ असा नाही की सर्व कायमचं बंद असेल. लोकल कधी सुरु होणार असा प्रश्न विचारला जात आहे. त्यावर विचार सुरु आहे. अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. राज्यातही शिथिलता देण्यात येणार आहे. पण, जबाबदारीचं भान ठेवून सवलत देणार आहोत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray
पेगॅसस प्रकरण खरं असल्यास आरोप गंभीर- सुप्रीम कोर्ट

व्यापाऱ्यांना, दुकानदारांना, नागरिकांना मी विनंती करतो की त्यांनी संयम ठेवावा. कोणी आमचा दुष्मन आहे किंवा कोणी आमचे लाडके आहेत, अशातली गोष्ट नाही. त्यामुळे परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाईल. परिस्थिती बिघडू नये म्हणून पाऊलं उचलली जात आहेत, असं ठाकरे म्हणाले. कोरोनामुळे झालेल्या चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्या. कोरोनामुळे आपण आरोग्याची जास्त काळजी घेऊ लागलो आहोत., असंही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com