मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेला संबोधित करणार! कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर बोलण्याची शक्यता

तुषार सोनवणे
Sunday, 22 November 2020

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेला सायंकाळी 8 वाजता संबोधित करणार आहेत.

मुंबई - नवरात्रीपासून कमी होत असलेला कोरोना संसर्ग दिवाळी नंतर पुन्हा वाढायला लागला आहे. राज्यातील कोरोनाची आकडेवारी पुन्हा वरच्या दिशेला सरकू लागली आहे. आज ( रविवार 22 नोव्हे) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेला सायंकाळी 8 वाजता संबोधित करणार आहेत.

हेही वाचा - शिवप्रेमींमध्ये आनंद! आठ महिन्यांनंतर 'रायगड'चा रोपवे पर्यटकांसाठी खुला

दिवाळीत राज्यातील मंदिरे सुरू करण्यात आली. राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत स्थानिक प्रशासनाला अधिकार दिले आहेत. राज्यातील रेल्वे वगळता बहुतांष सार्वजनिक वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहे. त्यातच दिवाळीसारख्या सणाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात बाजारात गर्दी केल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली होती. त्याची प्रचिती हळुहळु दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा कमी होत असलेला आकडा आता वरची दिशा घेऊ लागला आहे. त्यापार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सायंकाळी 8 वाजता काय संबोधित करतात याकडे साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.

हेही वाचा - अखेर जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी खुला; परिसरात झाडेझुडपे वाढल्याने दक्ष राहण्याचे आवाहन

मुख्यमंत्र्यांच्या संबोधनातील अंदाजीत विषय

  • कोरोनाच्या संसर्ग वाढीमुळे निर्बंध वाढवण्याच्या शक्यता
  • राज्यातील शाळांबाबत महत्वाचा निर्णय अपेक्षित
  • सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्याबाबत निर्णय
  • राज्यात पुन्हा कोरोना चाचण्यांचा वेग वाढवणार
  • लांब पल्ल्याच्या गाड्या विमान सेवांवर निर्बंध
  • राज्यात रात्री कडकडीत संचारबंदी 
  • विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईचा वाढणार 

----------------------------------------------------------


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chief Minister Uddhav Thackeray will address the people of the state! Likely to speak on the increasing prevalence of corona