मुख्यमंत्र्यांचे 'मातोश्री' हे निवासस्थान उडवून टाकण्याची धमकी; दुबईहून कॉल आल्याची माहिती

सकाळ वृत्तसेवा 
Sunday, 6 September 2020

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दुबईहून धमकीचे 3-4 कॉल आले असल्याची माहिती मिळतेय.

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दुबईहून धमकीचे 3-4 कॉल आले असल्याची माहिती मिळतेय. दाऊद इब्राहिमच्या हस्तकाकडून हे कॉल आले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या कॉलमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान 'मातोश्री' उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. 

या कॉल बाबत मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दरम्यान, मातोश्री या निवासस्थानी पोलिसांकडून सुरक्षा वाढवण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chief Ministers threat to blow up Matoshri residence; Information that the call came from Dubai