लग्नाचा मंडप टाकला, नातेवाईकही आले; पण...

file photo
file photo

मुंबई : चाइल्डलाइनने वेळीच दाखवलेल्या सतर्कतेमुळे एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह होताहोता रोखला. विटावा येथे शनिवारी दुपारी हा बालविवाह होणार होता. 

विटावा येथील एका सोळावर्षीय अल्पवयीन मुलगी सविता (नाव बदलले आहे) हिचा बालविवाह कासोडा येथील तरुणाशी शनिवारी (ता.एक) रोजी आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी मंडप टाकण्यात येऊन पाहुण्यासाठी स्वयंपाकही तयार करण्यात आला होता. दुपारी एकच्या सुमारास होणाऱ्या या बालविवाहाला मुलामुलीकडील नातेवाईकही आले होते. मात्र मुलीचे वय विवाहास योग्य नसल्याची माहिती मुंबईच्या चाइल्डलाइनला मिळाली.

तेथून फोन खणखणल्याने औरंगाबाद येथील मराठवाडा ग्रामीण विकास संस्था, चाइल्डलाइन १०९८ चे समुपदेशक मिलिंद अकोलकर, योगेश उगले, आकाक्ष बेडवाल यांनी धाव घेत ग्रामविकास अधिकारी रमेश मुळे यांना लेखी पत्र देत बालविवाहाची चौकशी करून तो थांबवण्याची विनंती केली.

दरम्यान वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चेतन ओगले, हवालदार काकासाहेब जगदाळे, दीपक साळुंके, प्रकाश गायकवाड यांनी धाव घेत प्रथम विवाह होत असलेल्या अल्पवयीन मुलीच्या पालकांची भेट घेतली.

त्यानंतर चाइल्डलाइन १०९८ चे समुपदेशक मिलिंद अकोलकर, पोलिस उपनिरीक्षक चेतन ओगले, ग्रामविकास अधिकारी रमेश मुळे यांनी मुलामुलीच्या नातेवाइकांचे समुपदेशन करत बालविवाह कायद्याने गुन्हा आहे, बालविवाह केल्यास बालविवाह प्रतिबंध कायद्याप्रमाणे दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा त्याचप्रमाणे पन्नास हजारांपर्यंत दंड होऊ शकतो, या कायदेशीर बाबी समजाऊन सांगितल्या. तसेच मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत विवाह न करण्याचे हमीपत्र लिहून घेतले. त्यानंतर मुलामुलीकडील नातेवाइक हा विवाह न करताच आपाल्या घरी परतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com